चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहर, एक अतिशय प्राचीन शहर. या शहराची मुख्य ओडख म्हणजे येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळ. या शहरामध्ये मध्ययुगीन काळातील काही वास्तु आहेत. यामध्ये २००० वर्ष पूर्वीची बुद्धलेणी तसेच १००० वर्ष पूर्वीचे पुराव्यात असलेलं विदर्भातील एकमेव भद्रनाग स्वामी देवस्थान आहे .या व्यतिरिक्त भद्रावती मध्ये प्रसिद्ध असलेलं पार्श्वनाथ जैन तीर्थ क्षेत्र आणि गवराला येथील प्राचीन गणेश मंदिर आहे. या सर्व वास्तु अतिशय प्राचीन असल्याने भद्रावती शहराला एक विशिष्ट अशी ओडख आहे.
भद्रावती हे शहर चंद्रपूर पासून २८ किलोमीटर अंतरावर आहे . या शहरालगद नागपूर-चंद्रपूर हा दोन पदरी नॅशनल हायवे गेला आहे. या शहराला लागूनच भांदक रेल्वे स्टेशन आहे. येथून नागपूर एअरपोर्ट हे सांगाड्यात जवडचे विमानतळ आहे. या शहराला नागपूर तसेच चंद्रपूर वरून येण्या करीता बसेस तसेच खाजगी वाहनाचा वापर करता येतो. येथील ट्रान्सपोर्ट सुविधा उत्तम आहे.
भद्रावती शहराच्या इतिहासावरून असे लक्षात येते कि इथे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या धर्मातील शासन काळ असावा. इथे गोंडराज्यच्या काळातील किल्ला आहे. येथील प्रत्येक दगडावरील कोरीव काम हे प्राचीनता दर्शवते. या व्यतिरिक्त या शहरामध्ये भवानीमातेचे प्राचीन मंदिर आणि रेणुका मातेचे मंदिर आहे.असा या शहराचा ऐतेहासिक वारसा कदाचितच दुसऱ्या शहराला असावा.
प्राचीन भद्रावतीचा मध्ये नागवंशी राज्याचा काही वस्तू आढळतात तसेच येते गोंडराज्याचा काळातील वास्तू पण दिसत असतात । या शहरामध्ये जमिनीमध्ये खोदकाम केले असता इथे प्रत्येक ठिकाणी काही तरी अवशेष मिडतच असते। या वरुण लक्षात येते कि इथे खूब वर्षांपासून इतिहास दडलेला आहे । एक चिनी इतिहास कार ह्यून ए त्संग या शहराच्या इतिहासावर काही पाने उजाडतो । भद्रावती येथे बुद्ध, जैन, हिंदू, नागवंशीय व गोंड अशा वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या काळात नांदलेल्या।
भद्रावती शहर हे अतिशय प्राचीन असल्याने इथे अनेक शिल्प सापडतात । या शिल्पा शिवाय इथे अतिशय प्राचीन असलेली बुद्ध लेणी आहे । या लेणीचा इतिहास हा २००० वर्ष आधी घेऊन जातो । इथे इसवी सन 639 च्या दरम्यान एक चिनी इतिहासकर युवानच्वांग जो जग भ्रमणासाठी त्याकाळात प्रसिद्ध होतो तो इथे आला होता । त्याने या बुद्ध लेणी जवड 1,400 भिक्षु निवास करीत होते असे लिहिले आहे । तसेच या काळात भद्रावती येथील राजा सोमवंशीय होत असे त्याने लिहिले आहे ।
भारतामध्ये नाग देवाची प्राचीन काळापासून पुज्या करण्यात येत आहे । भारतामध्ये काही मुख्य अशी नाग देवाची मंदिरे आहेत यामध्ये भद्रावती येथील भद्रशेषाचे मंदिर हे सुद्धा एक मुख्य मंदिर आहे । या मंदिरात प्रवेश करताच या मंदिराचा गाभारा बघितल्यावर असे लक्षात येते कि हे मंदिर हेमाड पणती आहे ।आता अस्तित्वात असलेले मंदिर जवडपास 1000 वर्ष पूर्वीचे आहे । परंतु इथे एक शिलालेख आहे या शिलालेखामध्ये असे लिहिले आहे कि ह्या मंदिराचा ११४६ साली जीर्णोद्धार करण्यात आला । यावरून असे कडते कि हे मंदिर 1146 च्या आधी पासून अस्तित्वात होते।
जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मातील एक धर्म आहे। या धर्माची तीर्थ स्थळे हि भारतभर पसरलेली आहे । तसेच मध्यभारतातील भद्रावती येथील मुख्य आकर्षणा पैकी एक पार्श्वनाथ मंदिर आहे। जैन धर्मा मध्ये 100 वर्ष पुर्वीच्या मंदिराला तीर्थ असे मनतात। हे मंदिर सुद्धा एक तीर्थ आहे । या मंदिराचा १८३१ मध्ये जीर्णोद्धार झाला होता असे लेख सापडतात । या आधीपण या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असे पण लेख आहे । या तीर्थाची विशेषतः म्हणजे इथे केशर चढावा चढविला जातो यावरूनच या तीर्थाला श्री केशरिया पार्श्वनाथ असे पण संबोधल्या जाते ।
विदर्भातील अष्टविनायका मधील वराधविनायक गणेश मंदिर हे भद्रावती मध्ये आहे । हे गणेश मंदिर हेमाडपंती असल्याने पुरावे आहे । हे मंदिर 13 व्यया शतकातील असावं असा अंदाज आहे । या मंदिरामध्ये अनेक अश्या प्राचीन मुर्त्या बघायला मिळतात । ह्या मंदिरामध्ये मूर्तीचे अगदी जवडून दर्शन करता येते। येथील परिसर हा भद्रावतीमधील मुख्य पर्यटन म्हणून बघितला जातो । हे मंदिर एका टेकडीवर छोट्या गुफे मध्ये आहे ।
या प्राचीन मंदिरा व्यतिरिक्त इथे सुरक्षा नगर येथील गज्यानन मंदिर , विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील विठ्ठल मंदिर , बंगाली कॅम्प येथील दुर्गा मंदिर, बगडे वाडी येथील साई मंदिर , विज्जसं येथील संतविदेही सद्गुरू जग्गनाथ महाराज मठ , झिंगुज्जी वॉर्डातील झीनगुजी महाराज मठ अशे अनेक मंदिरे इथे आहेत । भद्रावती येथे बौद्ध धर्मातील प्रार्थना स्थळे आहे । या मध्ये विजासन टेकडी बुद्ध विहार , बुद्ध विहार डिफरेन्स , बुद्ध विहार गौतम नगर, पंचशील बुद्ध विहार पंचशील नगर, बुद्ध विहार आंबेडकर नगर, बुद्ध विहार Dr बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आहेत । या शहरामध्ये मुस्लिम धर्मातील काही प्रार्थना स्थळे आहे या मध्ये ख्वाजा गरीब नवाझ मस्जिद भोजवार्ड, जामा मस्जिद बाजार वॉर्ड, मदिना मस्जिद शाही चौक, डिफरेन्स मस्जिद O।F चांदा - सुमठाना रोड ,हनफीया मस्जिद डोलारा तलाव, नूरानी मस्जिद गौराला असे आहे । या सोबतच शिख धर्मातील गुरुद्वारा गुरुनानक साहिब डोलारा आणि गुरुद्वारा , O।F चांदा - सुमठाना रोड इथे आहे । क्रिश्चन धर्मातील St । थॉमस चर्च , गांधी चौक ,The पॅन्टेकोस्टल मिशन चर्च ठेंगे प्लॉट चिचोरडी , चर्च O।F चांदा सुमठाना रोड, ख्रिश्चन चर्च डोलारा तलाव, चर्च आंबेडकर नगर हि काही महत्वाची प्रार्थणा स्थळे आहेत ।
वरदविनायक गणेश मंदिर
बुद्ध लेणी भद्रवती
पार्श्वनाथ जैन मंदिर भद्रावती
भद्रनाग मंदिर भद्रावती
भद्रावती मधील गोंडवाना राज्यातील किल्ला
भवानी माता मंदिर
भद्रावती शहर मुख्यतः विदर्भातील पर्यटनासाठी खूब प्रसिद्ध शहर आहे । इथे नागपूर किंवा चंद्रपूर येथून येत असताना ट्रान्सपोर्ट ची उत्तम अशी सुविधा बघायला मिळते । शहरामध्ये प्रवेश करण्या आधी एक भव्य असं स्व, बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वारातून प्रवेश करावा लागतो । या द्वारातून प्रवेश करताच भद्रावती शहरातील इमारती दिसतात । या शहराच्या एका बाजूला बसस्टॉप तर दुसऱ्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे । या शहराच्या बाजूलाच जंगलाचा काही भाग आहे । इथे जंगली प्राण्यांचा वावर बघायला मिळतो । इथे काही वेळा वाघांचे सुद्धा दर्शन होत असते । या शहरामध्ये नागपंचमी तसेच महाशिवरात्रीला येथील नागमंदिरामध्ये भव्य अशी जत्रा भरत असते। या मंदिरामध्ये भद्रशेषाच्या दर्शन करिता या जत्रेमध्ये भाविक हजारोंच्या संख्येने येत असतात । या शहरामध्ये हा काळ महत्वाच्या असतो । तसेच वरदविनायक गणेश मंदिरामध्ये गणेश चतुर्थीला भाविकांच्या रांगा बघायला मिळते । भद्रावती हे शहर धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमी चर्चेत असते। इथे रामनवमी,छत्रपती शिवाजी महाराज जयंती, भारतरत्न DR बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीला भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात येत। या सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती , गज्यानं महाराज प्रकट दिन , साईबाबा प्रकट दिन कार्यक्रम तसेच शोभा यात्रा काढण्यात येते। येथील पार्श्वनाथाचे मंदिर बघितल्यावर मंदिरातील परिसर बघताच मनाला अतिशय प्रसन्न वाटत असत । याच बरोबर प्राचीन बुद्ध लेणी मधील शिल्पाचे अवशेष बघताच भूतकाळात गेल्या सारखा अनुभव येतो। तसेच येथील गोंड कालीन किल्ला हा इतिहास समोर आणतो ।
विदर्भातील अष्टविनायक मंदिरातील वरदविनायक गणेश मंदिर हे भद्रावती मध्ये आहे । टेकडी गणपती नागपूर हा याच अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे । भद्रावती येथील बुद्ध लेणी हि २००० वर्ष पूर्वीची लेणी आहे असे इतिहासकार सांगतात । विदर्भातील एकमेव शेषनागाचे मंदिर हे भद्रावती मध्ये नागमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे । भद्रावती मधील गोंडवाना राज्यातील किल्ला हा १००० वर्ष पूर्वीचा आहे असे इतिहासकार सांगतात ।