ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यामधील चिमूर तालुका हा पावसाळा तसेच हिवाळा या ऋतू मध्ये पर्यटकांसाठी नंदनवन ठरतो। या तालुक्याला लाभलेले निसर्ग सौंदर्य अतिशय आकर्षक आहे। या तालुक्यातील काही मुख्य ठिकाणे आहे जिथे पर्यटक न चुकता भेटी देत असतात,चंद्रपूर जिल्ह्यातीलच पर्यटक नवे तर अगदी नागपूर पासून इथे पर्यटक येताना दिसते, यातीलच एक म्हणजे रामदेगी।.

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

Ramdegi distance from nagpur

हे नागपूर पासून 117 किलोमीटर अंतरावर असलेले पर्यटन स्थळ आहे। नागपूर वरून येत असताना हेंद्राबाद-नागपूर हायवेने प्रवासकरून समोर जांभ या गावाजवडून चंद्रपूर मार्गे यावे। तिथून 18 किलोमीटर अंतरावर नांदोरी गावापासून डाव्या हातावर वाशी-कोरा या मार्गाने यावे। इथून बोनठळी गावापासून उजव्या हाताने चिमूर वरोरा या मार्गाने यावे इथून समोर जाताना डाव्याहाताला एक भव्य गेट नजरेस पडले। या गेट मधून प्रवेश करून काही काळ कच्या मार्गाचा वापर करावा लागतो या नंतर रामदेगी ला पोहचत असतो। .

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

chandrapur to ramdegi distance

चंद्रपूर वरून रामदेगी ला जाण्याकरिता वरोरा मार्गावरून 80 किलोमीटर एवढे अंतर येत असते। तसेच मोहुर्ली वरून गेल्यास हे अंतर 1 किलोमीटर ने कमी होते सोबत ताडोबा जंगलाची काही दृशे सुद्धा दिसत असतात। जर पाऊस येत असला तर हे जंगल आणखी आकर्षक दिसत असते।.

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

या पर्यटन क्षेत्रा मध्ये निसर्ग निर्मित विविध स्थळे बघायला मिळते। इथे एकाच पर्यटनात धबधबा,डोंगर,जंगल,धरणे,मंदिरे आणि अनेक अशा बौद्ध धर्माची प्रार्थना स्थळे बघायला मिळतात। येथील अनेक अशा प्राचीन गुफ्फा आहे जिथे बौद्ध भंती ध्यानस्त दिसतात। चिमूर- वरोरा या मार्गावरून प्रवेश गेट मधून प्रवेश करताच हिरव्यागार दाटून असलेल्या जंगलाचा सहवास होत असतो। येथील मार्ग थोडासा कच्चा स्वरूपाचा असल्याने थोडा त्रास होतो पण जसे जसे समोर जात असतो तसे तसे जंगलातील अनेक प्रकारची निसर्ग रम्य दृशे दिसण्यास सुरवात होत असते। काही अंतरावर गेले असता एक छोटेसे धरण दिसते या मधून येणारे पाणी रस्त्याच्या वरून ओव्हरफ्लोव होताना दिसते। काही काळ भीती दायक वाटणारा हा प्रसंग या पाण्यावरून गाडी पार केल्यावर विसर पडत असतो। .

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

या प्रवाहातून वाहणाऱ्या पाण्याला बघताच या पर्यटनाच्या सौन्दार्याची सुरवात झालेली दिसते। इथून समोर जाताच अशाच आणखी छोट्या जलप्रवाहाचे दर्शन होते। काही वेळाने समोर बघताच भव्य अशा डोंगराचे सौंदर्य नजरेस पडते। हिरवाकंच झाडांनी नटलेल्या , वाघ जसा एखाद्या शिकारीच्या शोधात दभा धरून बसतो तसे हे डोंगर संपूर्ण जंगलाच्या मध्ये लपून बसल्या सारखे दिसतोअसे हे अतिशय आकर्षक वाटणारे दृश्य नजरेस पडते। .

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

गाडी वरून खाली उतरताच पावसाच्या वारंवार येण्यामुळे ओल्या जमिनीचा सर्वत्र पसरलेला सुगंध,या सोबतच अनेक अशा छोट्या छोट्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेले धबधबे, यामध्ये जंगलाच्या मध्यभागी असल्याने अनेक प्रकारच्या पक्षांचे आवाज अशा अनेक गोष्टी मनाला भारावून टाकत असतात। काही वेळाने डोंगर पायथ्याकडे लक्ष दिले असता दगडांनी बांधलेले प्राचीन मंदिर दिसत। इथे जाण्याकरिता काही दगडाच्या पायऱ्या सुद्धा दिसतात। येथील काही स्थानिक लोकांनी या मंदिर परिसरात अनेक पूजेची दुकाने सुद्धा लावलेली दिसते। या लोकांच्या सोबत बोलताना असे कळते कि हे मंदिर प्रभू श्री राम विजयानंतर इथून जात असताना इथे काही काळ थांबले होते असे म्हटल्या जाते या कारणाने याला रामदेगी असे नाव देण्यात आले।.

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

या मंदिरामध्ये प्रवेश करताच अनेक प्राचीन मुर्त्या या मंदिराच्या आवारात ठेवलेल्या दिसतात। काही मुर्त्या अतिशय जीर्ण अवस्तेत असल्याचे लक्षात येते। हे मंदिर कोणी बांधले व किती वर्ष प्राचीन आहे यावर संशोधन झालेले नाही परंतु येथील काही शिल्पावरून हे मंदिर साधारण 1500 पूर्वीचे असावे असा प्राथमिक अंदाज येतो। या मंदिरामध्ये पुज्या करून मागच्या बाजूलाजाताना कानावर अतिशय तीव्र असा पाण्याचा प्रवाहाचा आवाज येण्याचा भास होतो। इथून समोर जाताना एका अविस्मरणीय क्षणाची सुरवात होते।.

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

हिरव्यागार वनराईत दोन डोंगराच्या मधातून ,उंचावरून पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा धबधबा बघताच मन हरवून जात असत। हा धबधबा निसर्गातील एक सुंदर दृश्य आहे जिथे सर्वत्र प्रस्सनता आणि शांतता बघायला मिळते। या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी जास्त होताना दिसतो सोबतच येथे साचलेल्या पाण्यामध्ये पर्यटक आनंद घेताना दिसतात। अतिशय मन मोहक स्वरूपाचं दृश्य बघताच मनामध्ये चैतन्य निर्माण होत असते। या धबधबाच्या साचलेल्या पाण्यामध्ये छोट्या छोट्या मासोळ्या निवांतपणे पाण्यामध्ये फिरताना दिसतात याना हाताने पकडण्याचा प्रयत्न केल्यास अतिशय चपळाईने हातातून निसटून जात असतात। असे करताना जवाडपास एक तासाहून अधिक काळ कसा निघून जातो याचे भान सुद्धा राहात नाही। हा धबधबा या रामदेगीचे पावसाळ्यातील मुख्य आकर्षण आहे। इथून रजा घेत समोर गेले असता डोंगराच्या वरच्या बाजूला लोकांचा आवाज कानावर पडतो।.

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

डोंगरपायथ्यापासून वरच्या बाजूला जाण्याकरता पायऱ्या चा शोध घेत आम्ही समोर निघालो। इथून समोर जाताना एक डोंगरावरती जाण्याकरिता वाट मिळाली जवळपास 400 पायऱ्या चालून डोंगरावर गेले असता अतिशय सुंदर दृश्य दिसते। हिरव्यागार ताडोबा वनक्षेत्रातील दूरवर पसरलेला परिसर बघताच मन अतिशय प्रसन्न होते। याच्या साथीला डोंगरच्या उंच भागातील थंडगार हवा ,पावसाच्या सरी ,दूरवर पसरलेले धुके एक अप्रतिम असं मिश्रण अनुभवायला मिळते। हे बघताना डोंगाच्या एकदम समोरच्या बाजूस दूरवर पसरलेले चारगाव तलाव नजरेस पडतो या तलावाचा अंत बघताना कुठे ढग मिळतात याचा अंदाज सुद्धा येत नसतो। ढगाळ वातावरणाने परिसरात दूरवर कुठे सूर्यकिरण तर कुठे सावली पाळताना दिसते। या सर्व पर्यटनाचा हा एक मुख्य क्षण म्हणून या कढे बघता येते। .

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

या डोंगरावर गेले असता काही अंतरावर एक बौद्ध प्रार्थना स्थळ दिसते। येथे काही भंतेजी ध्यानस्त बसलेले दिसतात। इथून थोडं अंतरावर अनेक लेण्या बघायला मिळते जिथे भंतेजी ध्यानस्त असतात। या लेण्या अतिशय कोरीव असून किती वर्ष पूर्वीच्या आहे याचा सध्या तरी शोध नाही। या डोंगरावरून दुसऱ्या बाजूने खालच्या बाजूला गेले असता धबधब्यचा मूळ लक्षात येथे। या परिसरात अनेक जंगली प्राण्याचा वावर होत असल्याचे येथील स्थानिक सांगतात। या मध्ये अस्वल, बिबटे तसेच पट्टेदार वाघाचे सुद्धा दर्शन होत असते असे येथील स्थानिक सांगतात परंतु इथे पर्यटकांची संख्या जास्त असल्याने घाबरण्यासारखे काही कारण नाही । यामुळे इथे ताडोबामध्ये प्रवेश करण्याकरिता एका गेट ची सुद्धा सुविधा उपलबध करण्यात आलेली आहे।.

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

हे जंगलातील ठिकाण असल्याने इथे अनेकदा मानवी कार्यामुळे काही विचित्र प्रसंग होताना दिसतो यातील एक प्रसंग आमच्या सोबत घडला। येथे थंडगार झालेल्या परिसरामध्ये काही मित्रांनी मिळून शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न केला यासाठी जवाडपास असलेल्या सुख्या काढ्यांचा वापर करून याला आग लावली आगेमुळे धूर झाला व वरच्या दिशेला गेला कोणाचेही लक्ष नसलेल्या एका मधमाशांच्या पोळ्याजवर हा धूर गेला या कारणाने सर्व मधमाशा आमच्या वर धावून आल्या या मुले सर्व मित्र मंडळी गाडीच्या दिशेने धाव घेतली आणि कोणालाही विशेष इजा झाली नाही। आश्चर्यच कारण एक कि येथील स्थानिकांना या मधमाशांनी कोणताही त्रास दिला नाही। असा प्रसंग तुमच्या सोबत घडू नये याची काळजी घ्या आणि एकदा नक्की या पर्यटन क्षेत्राला भेट द्या।.

ramdegi-waterfall-temple-chimur-chandrapur

अशाच अनेक पर्यटनाचा मराठीतून शब्दरूपी आनंद घेण्याकरिता तसेच या पर्यटनाबध्दल अधिक जाणून घेण्या करिता आमच्या दुसऱ्या पोस्टला भेट द्या।.

popular city and place