place-to-visit-in-amravati

𝟱 𝑨𝒎𝒂𝒛𝒊𝒏𝒈 𝑻𝒐𝒖𝒓𝒊𝒔𝒕 𝑷𝒍𝒂𝒄𝒆𝒔 𝑮𝒖𝒊𝒅𝒆

place-to-visit-in-amravati

अमरावती जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा आहे। विदर्भाच्या मुख्य दोन विभागापैकी एक अमरावती विभाग आहे। या जिल्ह्याची ओळख येथील संतांच्या लाभलेल्या वारसा वरून होते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्यामध्येच झाला आहे। संतांच्या वारसा सोबतच या जिल्ह्याला निसर्ग सौंदर्य सुद्धा लाभलेले आहे।

सातपुडा पर्वत रांगा अमरावती जिल्ह्यासाठी एक वैशिष्ट्य पूर्ण वारसा लाभलेली पर्वत रांग आहे। याच पर्वत रांगेवर अनेक असे टुरिस्ट स्पॉट तयार झाले आहे। या सोबतच मेळघाट च्या जंगलाचा सुद्धा समावेश होतो । महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणां पैकी एक प्रमुख असलेले चिखलदरा पर्यटन या अमरावती जिल्ह्यातील एक मुख्य पर्यटन आहे । .

place-to-visit-in-amravati

Tourist places list in Amravati Dist.
अमरावती जिल्ह्यातील मुख्य पर्यटनाची यादी.

1 चिखलदरा आणि येथील मुख्य आकर्षणाचे ठिकाण
2 मेळघाट व्याघ्रप्रकल्प
3 बांबू उद्यान
4 श्री अंबा देवी मंदिर
5 उप्पर वर्धा धरण


How to reach Amravati?
तुम्ही अमरावतीला कसे पोहचाल ?

नागपूर वरून 154 किलोमीटर अंतरावर अमरावती हे शहर आहे। तसेच अकोल्याहून इथे पोहचण्याकरिता 100 किलोमीटर इतके अंतर गाठावे लागत असते। पुण्याहून ५५० किलोमीटर एवढे अंतर पडत असते। हे सर्व अंतर बाय रोड आहे। तसेच या शहराला लागूनच असलेले बडनेरा हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे। इथे सुपर फास्ट एक्सप्रेस सुद्धा थांबत असतात। Amravti District Map .

place-to-visit-in-amravati

अमरावती शहरातील प्रसिद्ध असलेले आकर्षणाचे ठिकाणे


हजारो वर्षा पूर्वीचे श्री अंबा देवी मंदिर हे अमरावतीच्या जुन्या भागात आहे। तसेच वडाळी येथे भारतातील पहिले बांबू उद्यान हे सुद्धा एक मुख्य आकर्षण आहे। या सोबतच अनेक ठिकाणे आहे जी अमरावती शहराच्या बाहेरची मुख आकर्षणे आहे।

अमरावती जिल्ह्यातील मुख्य आकर्षणे


या जिल्ह्यात मेळघाट प्रकल्प तसेच सातपुळा च्या कुशीत वसलेले चिखलदरा आणि उप्पर वर्धा हे धरण या जिल्ह्यातील मुख्य आकर्षण आहे।

1.चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण


सुमारे 3500 फूट उंचीवर सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे। अमरावतीहून सुमारे 66 किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे। एखाद्या शिकारी साठी वाघ जसा दबा धरून बसतो तसा हा चिखलदरा तहसील संपूर्ण डोंगर दरीच्या मधोमध्ये वसलेले आहे।

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले हे पर्यटन स्थळ हिवाळ्यामध्ये अधिक आकर्षक वाटत असते। निसर्गाच्या सानिध्यात विशेषतः हिरव्यागार डोंगरामध्ये थंडगार वाऱ्यांचा अनुभव एक अविस्मरणीय क्षण असतो। याच काळात मुख्यतः विदर्भातील पर्यटक या क्षणांचा आनंद घेण्याकरिता प्रामुख्याने हजेरी लावताना दिसतात।
इथे अनेक ठिकाणे आहे जी अतिशय लोकप्रिय आहे यामध्ये
1 .गाविलगड किल्ला
2 .नरनाळा किल्ला
3 .पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
4 .ट्रायबल म्युझियम
या सोबतच आणखी काही ठिकाणे आहे याच्या संपूर्ण डिटेल माहिती करिता आमच्या चिखलदरा या पोस्ट ला भेट द्या। .

place-to-visit-in-amravati

2.मेळघाट व्याघ्रप्रकल्प


चिखलदरा तालुका तसेच धारणी तालुका येथील क्षेत्राला मेळघाट असे संबोधल्या जाते। अमरावती पासून 110 किलोमीटर अंतरावर याच क्षेत्रामध्ये वाघांसाठी राखीव असलेले मेळघाट वाघ्रप्रकल्प हा पर्यटकांसाठी एक अतिशय महत्वाचं पर्यटन स्थळ आहे। या क्षेत्रामध्ये विशेतः कोरकू समाजातील आदिवासी राहतात। या प्रकल्पामध्ये वाघा सोबतच अनेक जंगली प्राण्याचे वास्तव आहे। या मध्ये बिबट, अस्वल, कोल्हे आणि जंगली कुत्रे असे हिंस्त्र प्राणी सोबतच हरीण, रान म्हशी, सांबर सुद्धा राहतात।

मेळघाट हे सातपुडा पर्वत रांगेत वसलेले क्षेत्र आहे। इथून मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे या। या क्षेत्रामध्ये दाट वनक्षेत्र नाही हे वनक्षेत्र पानझडी वनक्षेत्रामध्ये येते परंतु हिवाळ्यामध्ये हे वनक्षेत्र अतिशय हिरवेगार होत असते। इथे सागाच्या झाडाचे प्रमाण अतिशय जास्त आहे। इथे पावसाळा लागायच्या आधी चा काळ वाघ बघण्याकरिता योग्य काळ असतो। या क्षेत्रातील रहिवासी असलेले कोरकू आदिवासी यांच्या अनेक परंपरा इथे बघायला मिळते। .

place-to-visit-in-amravati

3.बांबू उद्यान भारतातील सर्व प्रथम आणि सर्वात मोठे बांबू उद्यानअमरावती जिल्ह्यातील बांबू उद्यान हे देशामधील सर्वात पहिले बांबू उद्यान आहे। हे उद्यान अमरावती पासून 5 किलोमीटर अंतरावर वडाळी येथे आहे। अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक स्थळ आहे। देश विदेशात सुमारे अनेक प्रकारची बांबू आढळतात। इथे सुमारे 63 प्रकारच्या विविवध बांबू पासून हे उद्यान साकारण्यात आलेले आहे। सर्वात उंच बांबू, सर्वात जाड बांबू, काटेरी बांबू तसेच खाण्या योग्य बांबू असे सर्व प्रकारचे बांबू या उद्यानात बघायला मिळतात।

बांबू हे झाड नसून एक गवताचा प्रकार आहे। सुरवातीला बांबू तोडीला मनाई करण्यात आली होती परंतु आता बांबू पासून अनेक वस्तूंची निर्मिती होताना दिसत आहे। इथे सुद्धा अनेक अशा वस्तूंची निर्मिती बांबू पासून झालेली दिसते। सुमारे १८ हेक्टर मध्ये पसरलेले उद्यान पर्यटकांसाठी एका निसर्ग पर्यटनाचा आनंद देत असते।

इथे मुख्यतः सुट्टी मध्ये पर्यटक येताना दिसतात। या पर्यटनामध्ये प्रवेशहुल्क फक्त 20 रुपये ठेवण्यात आलेला आहे। या संपूर्ण क्षेत्रामध्ये विकास कामासाठी या शुल्काचा वापर केला जातो। या सोबतच इथे कमळ उद्यान, कॅक्टस उद्यानसुध्दा आहेत। .

place-to-visit-in-amravati

4.श्री अंबा देवी मंदिर :


अमरावती मध्ये असलेले श्री अंबादेवी मंदिर हे सुमारे १००० वर्ष पूर्वीचे आहे। अमरावती शहरा मध्ये वसलेले हे मंदिर एक मुख्य धार्मिक पर्यटन आहे। नवरात्री मध्ये 9 दिवसात संपूर्ण मंदिराच्या परिसरात उत्साहाचे वातावरण असते। येथे अनेक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते। संपूर्ण विदर्भात तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले हे मंदिर आहे। येथे भाविकांची नेहमी गर्दी दिसत असते।

या मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणाची आहे। मोगलांच्या काळात या मंदिराची नासधूस करण्यात आली होती समोर काही वर्षांनी 1660 च्‍या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला। अहिल्‍याबाई होळकर यांचेही श्री अंबादेवी मंदिराच्‍या उभारणीत मोलाचे योगदान आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे.असे काही लेखावरून कळते। या वरून असे लक्षात येते कि हे मंदिर अतिशय प्राचीन आहे।.

place-to-visit-in-amravati

5.उप्पर वर्धा धरण


अमरावती जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय असलेले उप्पर वर्धा हे धरण मोर्शी या तालुक्यामध्ये सिम्बोरा या गावामध्ये आहे। अमरावतीहून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे। हे विदर्भातील मुख्य धरणा पैकी एक आहे। या धरणाला १३ दरवाजे आहे।

हे धरण गोदावरी नदीची उपनदी असलेली वर्धा नदी वर बांधण्यात आलेले आहे। वर्धा नदी सातपुळा पर्वतातून उगम होऊन समोर अमरावती जिल्ह्यतून वर्धा जिल्ह्यात जाते तिथून समोर चंद्रपूर जिल्हा मधून वाहत असते। तीनही जिल्ह्यासाठी हि नदी एक जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाते।

पावसाळा हा या धरणाला भेट देण्याचा उत्तम काळ असतो। जेव्हा पावसाळ्यामध्ये अधिक पाऊस पळतो आणि पाण्याची पातळी वाढत असते तेव्हा ह्या धरणाचे दरवाजे सुरु केले जातात। संपूर्ण दरवाजे जेव्हा उघडले जातात तेव्हा पर्यटकांची अतिशय जास्त गर्दी इथे बघायला मिळते। या धरणाच्या खालच्या भागाला रस्ता गेला आहे।

या रस्त्यावर पर्यटक थांबून धरणाला बघण्याचा आनंद घेत असतात। अतिशय वेगाने पडणारे पाणी तिथून उडणारे पाण्याचे तुषार सर्वत्र पसरत असतात असे हे अतिशय सुंदर दृश्य इथे बघायला मिळते। संपूर्ण परिसरामध्ये तुषार पसरल्याने सर्वत्र ओलेचिंब झालेले दिसते। या क्षणाची कायम आठवण राहावी यासाठी पर्यटक फोटोशूट करताना दिसतात। तसे बघितले असता हे स्थळ फोटोशूट साठी अमरावती जिल्ह्यातील एक मुख्य स्थळ आहे।

असे हे आमच्या यादी मध्ये असलेले अमरावती जिल्ह्यातील मुख्य आकर्षण असणारे पर्यटन स्थळ आहे। या पर्यटन स्थळांना नकी भेट द्या। आणि आमच्ये अशेच आणखी आर्टिकल वाचा आणि तुमचा प्रतिसाद कळवा। .

popular city and place

place-to-visit-in-amravati

place-to-visit-in-amravati

𝟱 𝑨𝒎𝒂𝒛𝒊𝒏𝒈 𝑻𝒐𝒖𝒓𝒊𝒔𝒕 𝑷𝒍𝒂𝒄𝒆𝒔 𝑮𝒖𝒊𝒅𝒆