muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

मुक्ताई हा चंद्रपूर मधील चिमूर तालुक्यातील एक निसर्गाच्या सानिध्यातील असलेला डोमा या गावातील धबधबा । या धबधब्याची प्रसिद्धी खूब मोठ्या प्रमाणात असल्याने येते पर्यटकांची नेहमी गर्दी होताना दिसते। पावसाळ्यातील एक उत्तम असं पर्यटन स्थळ म्हणून याची ख्याती आहे। हिरव्यागार झाडांनी पसरलेल्या जंगलाच्या जवळ डोंगराळ परिसरामध्ये एका उंच डोंगरावरून पडणाऱ्या पाण्याचा धबधब्यला बघण्याकरिता पर्यटक दूरवरून येत असतात।.

muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

muktai waterfall distance from nagpur

नागपूर पासून 101 किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे। नागपूर वरून येत असताना उमरेड या मार्गाने भिवापूर वरून शंकरपूरला यावे लागते। शंकरपूर पासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर डोमा हे गाव आहे। या गावात प्रवेश करताना एका भव्य अश्या प्रवेशद्वारातून आत जावे लागते इथून जात असताना एका सिमेंट रोड चा वापर होतो। येथून हा धबधबा 2 किलोमीटर अंतरावर आहे। या गावात प्रवेश केल्यावर धबधब्याच्या वाटेवर असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हिरवीगार झाडी दिसत असतात।.

muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

muktai waterfall distance from chandrapur

चंद्रपूर वरून हे पर्यटन स्थळ मोहुर्ली या गावाच्या मार्गाने 103 किलोमीटर अंतरावर आहे जर भद्रावती वरून गेल्यास 121 किलोमीटर चा प्रवास करावा लागतो। मोहुर्लीवरून गेल्यास ताडोबा हे जंगल वाटेमध्ये येत असते। तसेच भद्रवती वरून गेल्यास नागपूर-चंद्रपूर हायवे पडत असतो हे दोन्ही मार्गामधील अंतर आहे। पावसाळ्यामध्ये येत असताना मोहुर्ली जवळील ताडोबा जंगल तसेच येथील धरणाचा आनंद घेता येतो।.

muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

muktai waterfall distance from bhandara

मुक्ताई धबधबा भंडारा जिल्यातील पर्यटकांना देखील आकर्षित करत असतो। भंडाऱ्यावरून मुक्ताई हे 84 किलोमीटर अंतरावर आहे। येथे येत असताना पवनी या गावावरून कंप या मार्गाने समोर शंकरपूर ला यावे लागते। येथून ११ किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे।.

muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

डोमा या गावावरून पर्यटन स्थळी जात असताना पावसाळ्यातील थंडगार गारवा अनुभवाला येत असतो। रस्त्याच्या बाजूला असलेलं हिरवेगार वन सोबत थेम्ब थेम्ब पडणारा पाऊस,पर्यटकांची गर्दी एका अविस्मरणीय अनुभवाची सुरवात होत असते। धबधबा म्हणलं कि एक वेगळा उत्साह पर्यटकांमध्ये दिसून येत असतो। विविध जिल्ह्यातील पर्यटक ज्यामध्ये महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच फॅमिली सुद्धा दिसत असते।.

muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

या पर्यटन स्थळाच्या जवळ पोहचताच डोंगर किनाऱ्यावरून दगडाच्या आडोशातून वाट शोधत असणाऱ्या पाण्याचे अनेक झरे वाहताना दिसतात। जमिनीवरचा ओलावा व दगडाला लागलेली शेवाळ यातून पाण्याचा वाहण्याचा आवाज कानावर पडताच मनाला अतिशय आनंद होत असतो। वारंवार एकाच प्रवाहाने वाहणाऱ्या पाण्यामुळे दगडांना एक विशिष्ट प्रकारचा आकाराची निर्मिती होताना दिसते । यावर पर्यटक अनेक प्रकारचे चित्रीकरण करताना दिसतात।.

muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

या समोर जाताच उंचावरून जोरात पाळणाऱ्या पाण्याचा आवाज कानावर येऊ लागतो याचा शोध घेत असताना सुमारे 120 फूट उंच अशा डोंगरावरून पाण्याचा अनेक धारा सरळ खाली कोसळताना दिसतात। हाच मुख्य धबधबा असल्याचे कळते। डोंगराच्या पायथ्याशी वारंवार पडणाऱ्या पाण्यामुळे जमा झालेल्या पाण्यावर शुभ्र फेस तयार होताना दिसतो। पाणी पडण्याचा वेग कमी जास्त होत असतो जेव्हा हा वेग कमी असतो तेव्हा अनेक पर्यटक या धबधब्याचा एकदम जवळून आनंद लुटताना दिसतात। डोंगराच्या पायथ्याशी स्वतःला ओले करून पर्यटक आनंद घेतात। या डोंगराच्या वरच्या बाजूला जाण्याकरिता सुद्धा एक छोटीशी पायवाट आहे। येथे गेले असतंच परिसरातील अनेक डोंगर हिरवीगार दिसत असतात। या सोबतच जर सूर्य किरणे आणि रिमझीम पावसाच्या सरी असल्यास निसर्गातील एक उत्तम दृश्य दिसत असते. .

muktai-waterfall-chimur-chandrapur-maharashtra

असा हा मुक्ताई धबधबा मनाला मुक्त करून आनंद देत असतो। अशाच प्रकारच्या अनेक निसर्ग निर्मित, धार्मिक तसेच एतेहासिक पर्यटनाचा मराठी लेखातून आनंद घेण्याकरिता आमच्या दुसऱ्या पोस्ट ला भेट द्या। एक अविस्मरणीय अनूभव तुम्हाला लेख वाचताना नक्की येणार तसेच तुमच्या ज्ञात सुद्धा भर पडणार।.

popular city and place