jamsavli-waterfall

जामसावली वॉटरफॉल | jamsavli ke hanuman

jamsavli-waterfall

जामसावली हे पर्यटना साठी प्रसिद्ध असलेले गाव छिंदवाडा मध्यप्रदेश मध्ये आहे। नागपूर वरून अवघ्या 64 किलोमीटर असलेल्या या गावात चमत्कारी हनुमान मंदिरा सोबतच येथील घोगरा वॉटरफॉल हि प्रसिद्ध पर्यटनाची ठिकाणे आहे। छिंदवाडा वरून विचार केल्यास 60 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। येथे मुख्यतः पावसाळ्यात निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता पर्यटक येत असतात।.

jamsavli-waterfall

मध्यप्रदेश हे राज्य घनदाट झाडांची वने असलेले राज्य आहे। इथे अनेक प्रकारचे पर्यटन स्थळे आहे जिथे निसर्ग प्रेमींसाठी एक मेजवानी बनत असतो। येथील अनेक नद्यांवर धबदबे बघायला मिळतात। यातील एक म्हणजे घोगरा वॉटरफॉल। जामसावली येथून काही अंतरावर कचारस्त्याची सोबत घेत या धबधब्याला भेट देता येते। येथे पोहचण्या आधीच नदीवरून जात असताना एका विशिष्ट पर्यटनाची ओळख होऊ लागते। नदी परिसरात पोहचताच अनेक दगडांचा समावेश असलेले पात्र दिसत असते। नदीच्या प्रत्येक दगडावर पाण्याच्या प्रवाहाने अनेक आकार तयार झालेले दिसते। .

jamsavli-waterfall

या सोबतच इथे दगडांच्या आडोशातून रस्त्याचा शोध घेत नदीतील पाणी वाहताना दिसते यामुळे अनेक छोटे मोठे धबधाची इथे निर्मिती झालेली दिसून येते। याच धबदब्यानं बघण्याकरिता पर्यटक येत असतात। या निसर्गरम्य परिसरामध्ये पर्यटक अगदी रमून जात असतात या सोबतच येथील दिसणाऱ्या दृश्याचे पर्यटक चित्रीकरण सुद्धा करीत असतात। या धबदब्यावर अनेक अशे फोटोशूट पॉईंट्स आहे जिथे पर्यटक फोटोसेशन करीत असतात। हा धबदबा नागपूर वरून जवड असल्याने वीकएण्ड तसेच सुटीच्या दिवशी इथे पर्यटकांची गर्दी बघायला मिडते।.

jamsavli-waterfall

या पर्यटनाच्या ठिकाणी येण्याकरिता पावसाळ्यातील पहिल्या पावसा नंतरचा जो काळ असतो तो अतिशय उत्तम ठरतो। या काळात येत असताना रस्त्याच्या दोनही बाजूंनी हिरवीगार पसरलेली निसर्गाची चादर। सोबतच थंड हवेचा गारवा विविध प्रकारच्या जंगली पक्षी तसेच प्राण्यांचा वावर सुद्धा होताना दिसतो। यामुळे या घोगरा वॉटरफोलच्या सौंदर्यामध्ये वाढ होताना दिसते। घोगरा वॉटरफॉल दिवसेन दिवस लोकप्रिय होताना दिसत आहे। इथे मध्यप्रदेश मधील छिंदवाडा येथील पर्यटक सुद्धा येत असतात। इथे मुख्यतः कॉलेज विध्यार्थी तसेच फ्यामिली टूर साठी आलेले पर्यटक दिसतात। येथे नास्ता तसेच जेवणा करिता विविध अशा हॉटेल तसेच धाब्याची सुद्धा व्यवस्था आहे। या क्षेत्राच्या जवडील लोकांसाठी हा एक पिकनिक स्पॉट झाला आहे। या सोबतच येथील चमत्कारी हनुमान मंदिराची पर्यटक भेट घेत असता।.

jamsavli-waterfall

चमत्कारी हनुमान मंदिर
जामसावली हे चमत्कारी हनुमान मंदिरासाठी मुख्यतः प्रसिद्ध आहे। येथील वॉटर फॉल प्रसिद्ध होण्या आधी येथील मंदिर प्रसिद्ध आहे। या मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती लेटलेल्या अवस्तेत आढळते। हि मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली असल्याचे दिसून येते। हे मंदिर अतिशय जागृत असल्याचे कळते। या मंदिरासोबत अनेक दंत कथा असल्याचे येथील भाविक लोक सांगतात। येथे एका दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात। हनुमान जयंतीच्या दिवशी भाविकांची संख्या इथे लाखोंच्या घरात पोहचत असते। .

jamsavli-waterfall

हे मंदिर स्वयं स्फुर्तीने तयार झालेले आहे असे येथील कर्मचारी सांगतात। इथे मंदिरामध्ये मूर्तीची कोणत्या एका व्यक्ती द्वारे स्थापना झालेली नाही । या मंदिराची लोकप्रियता खूब जास्त प्रमाणात असल्याने इथे दूरवरून भाविक येत असतात। यामुळे इथे नेहमी पहारेकरी तसेच पोलीस प्रशासन कार्यरथ असते। या मंदिरामध्ये काही मानसिक रोगी सुद्धा येत असताना दिसतात। इथे 41 दिवस राह्ल्याने मानसिक रोगी बरा होतो असते येथील कर्मचारी सांगतात। भारतामध्ये अशे काही मोजके मंदिरे आहे जिथे मानसिक रोगी बरा होतो हे मंदिर त्यातील एक आहे। .

jamsavli-waterfall

या मंदिरासोबतच असे एक आणखी मंदिर आहे जिथे हनुमानाची मूर्ती लेटलेल्या अवस्तेत दिसून येते। हे सुद्धा देवस्तातून अतिशय जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाते। हे मंदिर चंद्रपूर जिल्ह्याती अजयपूर इथे आहे। घनदाट जंगलाच्या मधोमध्ये अंधारीनदीच्या काठावरती हे मंदिर वसलेले आहे। या सोबतच नागपूर इथे प्रसिद्ध असं टेकडी गणेश मंदिर आहे जिथे सचिन तेंडुलकर दर्शन करण्याकरिता येत असतो। .

jamsavli-waterfall

जामसावली वरून काही अंतरावर असलेले बंजारा माता घाट हे एक प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे। इथे जात असताना निसर्गाचे अनेक रूप पाहायला मिळतात । डोंगर ,दऱ्या, पठारे तसेच घनदाट वृक्ष बघताच मनाला अतिशय आनंद होत असतो। विशषेत हिवाळ्यातील रिमझीम पावसाच्या झडी मध्ये येथील परिसर अतिशय सुंदर वाटत असतो। इथे जात असताना वाटेत पडणारे वळण रस्ते सोबत उंच असलेली डोंगरे रस्त्याच्या बाजूला असलेली दरी यामध्ये पडणाऱ्या हलक्या पावसाच्या झरी एक अतिशय आनंदाचे शन म्हणून स्मरणात राहत असतात। जामसावलीला गेले असता या परिसराला नाकी भेट द्यावी।
अशाच धार्मिक तसेच निसर्गातील पर्यटनाचा शब्दा रुपी आनंद घेण्याकरिता आमच्या आणखी काही लेखांचे वाचन करा आणि अशा स्थळांना आयुष्यात एकदा तरी भेट द्या। कारण प्रत्येक स्थळाची एक विशिष्ट ओळख असते।.

popular city and place

famous-temple-in-nagpur

famous-temple-in-nagpur

नागपूर येथील प्रसिद्ध मंदिर

jamsavli-waterfall

jamsavli-waterfall

जामसावली वॉटरफॉल | jamsavli ke hanuman

Salbardi-from-nagpur

Salbardi-from-nagpur

नागपूर ते सालबर्डी

futala-lake-nagpur-maharashtra

futala-lake-nagpur-maharashtra

फुट्टाला तलाव

dwarka-water-park-nagpur-entry-fees

dwarka-water-park-nagpur-entry-fees

द्वारका वॉटर पार्क