jain-mandir-bhadrawati

पार्श्वनाथ जैन मंदिर भद्रावती

jain-mandir-bhadrawati

जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मातील एक धर्म आहे। या धर्माची तीर्थ स्थळे हि भारतभर पसरलेली आहे । तसेच मध्यभारतातील भद्रावती येथील मुख्य आकर्षणा पैकी एक पार्श्वनाथ मंदिर आहे। जैन धर्मा मध्ये 100 वर्ष पुर्वीच्या मंदिराला तीर्थ असे मनतात। हे मंदिर सुद्धा एक तीर्थ आहे । या मंदिराचा १८३१ मध्ये जीर्णोद्धार झाला होता असे लेख सापडतात । या आधीपण या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असे पण लेख आहे । या तीर्थाची विशेषतः म्हणजे इथे केशर चढावा चढविला जातो यावरूनच या तीर्थाला श्री केशरिया पार्श्वनाथ असे पण संबोधल्या जाते।.

jain-mandir-bhadrawati

हे जैन मंदिर भद्रावतीच्या मध्यभागी स्तिथ आहे । या मंदिरामध्ये जाण्याकरिता भव्य असं प्रवेशद्वार आहे । या प्रवेशद्वारा वर सुंदर असे शिल्प काढलेले आहे । तसेच प्रवेश द्वाराला लागून दोन भव्य अशी हत्तींची प्रतिकृती आहे । या परिसरात उजव्या व डाव्या बाजूला सुबक अशी फुलांची बाग आहे।.

jain-mandir-bhadrawati

प्रवेश द्वारातून प्रवेश करताच शिल्पकलेने नटलेलं अतिशय उत्तम अश्या रचनात्मक पद्धतीमध्ये असलेलें श्री पार्श्वनाथाचं मंदिर दिसते। मंदिराला बघताच राजस्थान येथील शिल्प कलेची आठवण होत असते । या मंदिरामध्ये प्रवेश करण्याकरिता पायऱ्या चढाव्या लागतात । या मंदिराच्या प्रत्येक छोट्या छोट्या भागामध्ये कोरीव शिल्प आढळते । या मंदिराचा जीर्णोद्धार हा 2013 साली झाला असे येथील स्थानिक सांगतात ।.

jain-mandir-bhadrawati

या मंदिरात प्रवेश करताच अतिशय आकर्षक मूर्तीचे दर्शन घडते । हि मूर्ती श्री पार्श्वनाथ स्वामींची आहे । या मंदिरामधील वातावरण अतिशय प्रसन्न आहे। या मंदिरामध्ये नेहमी शांतता असते। या मंदिराच्या आवारात कबुतरांचा वावर होत असतो। भद्रावती हे धार्मिक तीर्थ स्थळानसाठी प्रसिद्ध आहे । श्री पार्श्वनाथाच्या मंदिरा सोबतच इथे काही हिंदू धर्मांची मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहे यामध्ये 1000 वर्ष पूर्वीचे भद्रनाग मंदिर तसेच या मंदिरा जवड असलेले एका जमिनी खालील गुंफेतील भवानी मातेचे मंदिर । या सोबतच 2000 वर्ष पूर्वीची बुद्ध लेणी तसेच गोंडवाना राज्य काळातील एक महत्वाचा किल्ला येथे आहे ।.

popular city and place