ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

चंद्रपूर जिल्यातील घोडाझरी वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी पावसाळयातील एक मुख्य पर्यटन केंद्र आहे। हा प्रकल्प नागभीड या तहसील मध्ये येत असतो। 2018 साली घोषित करण्यात आलेल्या या अभयारण्यामध्ये अनेक प्रकारचे जंगली प्राणी दिसून येत असतात। या प्रकल्पाची मुख्य ओडख म्हणजे येथील ब्रिटिश कालीन तलाव। हा तलाव बघण्याकरिता पर्यटक येत असतात। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या हिरव्यागार वनराईने नटलेला तलावाची साथ घेत पर्यटकाना आकर्षित करणारे स्थळ म्हणजे घोडाझरी। .

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

nagpur to ghodazari distance


नागपूर पासून 117 किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे। इथे येण्याकरिता नागपूर वरून उमरेड मार्गे भिवापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर नागभीड हे चंद्रपूर जिल्ह्यातील तहसील आहे। इथून हा प्रकल्प 12 किलोमीटर अंतरावर आहे। इथे येथ असताना बाईक तसेच कारचा वापर करता येतो तसेच नागपूर वरून गडचिरोली मार्गे जाणाऱ्या बस चा वापर करून नागभीड येथे येता येत। इथून समोर प्रायव्हेट गाड्यांचा वापर करावा लागतो। या कारणाने बाईक किंवा कार हा उत्तम पर्याय आहे।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

chandrapur to ghodazhari distance


चंद्रपूर पासून 108 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे। इथे येण्या करीता चंद्रपूर वरून मूल ला जावं लागते तिथून नागभीड चा रस्ता घ्यावा लागतो। येथून येत असताना जंगलाचा परिसर येथ असतो कधी जंगली प्राणी पण रस्ता ओलांडताना दिसत असतात। या मध्ये जर पावसाळा ऋतू असल्यास हिरव्यागार वनराईने बहरलेला निसर्गाचा सहवास होत असतो।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

best time to visit in ghodazari lake


घोडाझरी या पर्यटनाचा आनंद घेण्याकरीता पावसाळा हा मुख्य ऋतू आहे। पावसाळ्यातील रिमझिम पडणारा पाऊस सर्वत्र भिजलेले हिरवीगार झाडी मातीतून दरवळणारा सुगंध अशा अनेक गोष्टी बघायला मिळत असतात। या पर्यटनाला जाण्या आधी विविध प्रकारचे या पर्यटनावर आधारित चित्रीकरण बघत असताना मनाला खूब आनंद होत असतो। मनात अनेक विचार येत असतात इथे जाण्याची खूब जास्त प्रमाणात ओढ लागलेली असते। नागपूर किंवा अन्य ठिकाणांहून इथे येत असताना या परिसराच्या 20 ते 30 किलोमीटर आधी अनेक निसर्ग निर्मित देखावे बघायला मिळते। यामध्ये अनेकदा डोंगराच्या आडोशाला सूर्याची किरणे अचानक डोळ्यावर पळत असतात तसेच अनेकदा पावसाच्या काळ्याकित ढगांमध्ये सूर्य किरणासोबत सूर्य अदृश्य होताना दिसतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच अश्या झाडांचा पायथ्याशी अनेक असे पावसाच्या सतत येणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेले छोटे छोटे तलाव बघायला मिळते हे सर्व बघत असताना पर्यटकांच्या वाहनांचा समूह रस्त्याच्या एका बाजूला दिसतो।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

इथे पोहचताच एक भव्य गेट नजरेस पडते। येथे अनेक लोकांची गर्दी होताना दिसते। येथे काही तिकीट कॉउंटर्स आहे या गेट मधून प्रवेश करण्याकरिता इथे वाहनाच्या सोयीसाठी तिकीट कॉउंटर्स लावण्यात आलेले आहे। तसेच पर्यटकांना वाहनाचा शुल्क वगळता कोणताही शुल्क इथे घेतल्या जात नाही। येथून समोर जाताच पाण्याच्या लाटांचा आवाज कानावर पडतो। समोर बघताच एक भव्य असा तलाव नजरेस पडतो। या प्रकल्पाचे मुख्य अशे तीन ठिकाणे आहे यामध्ये एक वन्यजीव अभयारण्य दुसरे म्हणजे बोटिंग आणि तिसरे सगळ्यात लोक प्रिय असलेले गोडाझरी डॅम।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

ghodazari wildlife

येथील वन्यजीव अभयारण्य हे अतिशय घनदाट झाडांनी वेढलेले तलावाच्या काठावरती आहे। या अभयारण्यामध्ये ताडोबा अंधारी प्रकल्पातील तसेच उमरेड खराडला अभयारण्यातील वाघ येताना दिसतात। वाघासोबतच इथे बिबट , रानहल्ले आणि हरीण याचा मुक्त संचार होताना दिसतो। हे अभयारण्य 159 किलोमीटर अंतरावर पसरलेले आहे। या प्राण्यांसोबत अनेक सरपटणारे प्राणी सुद्धा आढळतात यामध्ये नाग,परडं तसेच अजगारांचा सुद्धा समावेश आहे। .

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

येथील वन्यजीव अभयारण्य हे अतिशय घनदाट झाडांनी वेढलेले तलावाच्या काठावरती आहे। या अभयारण्यामध्ये ताडोबा अंधारी प्रकल्पातील तसेच उमरेड खराडला अभयारण्यातील वाघ येताना दिसतात। वाघासोबतच इथे बिबट , रानहल्ले आणि हरीण याचा मुक्त संचार होताना दिसतो। हे अभयारण्य 159 किलोमीटर अंतरावर पसरलेले आहे। या प्राण्यांसोबत अनेक सरपटणारे प्राणी सुद्धा आढळतात यामध्ये नाग,परडं तसेच अजगारांचा सुद्धा समावेश आहे। .

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

हे अभयारण्य एका तलावाच्या काठावर असल्याने येथे अनेक प्रकारचे पक्षी बघायला मिळतात। या तलावामध्ये पक्षांसाठी भरपूर प्रमाणात खाद्य असल्याने इथे विविध प्रजातींचे पक्षी बघायला मिळते। पक्षी प्रेमींसाठी हा प्रकल्प एक महत्वाचा ठरतो। तलावाच्या काठावर खाद्याच्या शोधात असणारे पक्षी विविध प्रकारच्या रंगानी नटलेले मनमोकळ्या प्रमाणे वावरताना विविध प्रकारच्या पक्षांची आवाजे कानावर पडताच मनाला अतिशय आनंद होत असतो।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

या अभयारण्य मध्ये अनेक प्रकारची झाडे नजरेस पडते यामध्ये बांबू, मोह, तसेच तेंदू पत्ता हि मुख्यतः सर्वत्र पसरलेली दिसते। येथील रहिवासी अनेक प्रकारच्या आयुर्वेदीक वनस्पतींची दुकाने लावून दिसतात। तसेच पावसाळ्यातील पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक छोटी मोठी दुकाने इथे लावलेली दिसतात। या मध्ये विशेषतः नाश्त्याची दुकाने असते। पर्यटक सुद्धा थंड्या वातावरणामध्ये गरम पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

घोडाझरी हे अभयारण्य घोषित करण्या आधी सुद्धा हे अतिशय प्रसिद्ध होते याचे कारण म्हणजे येथील डॅम। पर्यटक या डॅम च्या ओव्हरफ्लोव चा अतिशय उत्सुकतेने वाट बघत असतात। येथील बांधण्यात आलेल्या टाक्यांची उंची अगदी ५ फुटापर्यंत आहे। या कारणाने येथे पर्यटक या टाक्यामध्ये उतरून आनंद घेताना दिसतात। पहिल्या पावसाच्या येण्यापासूनच इथे पर्यटकांना येण्याची चाहूल लागलेली असते। जसा जसा पाऊस पडायला सुरवात होते तसे तसे पर्यटक इथे येण्यास सुरवात होते। पहिल्या पावसानंतरच इथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येण्यास सुरवात होते। परंतु इथे येण्याचा हा वेळ अयोग्य आहे जेव्हा सतत पावसाचा वर्षाव होतो तेव्हा हा तलाव पाण्याने भरतो काही कालावधी नंतर तो ओव्हरफ्लोव व्हायला सुरवात होत असते। जसा हा तलाव ओव्हरफ्लोव होतो हा जो काळ असतो हा इथे येण्याचा सगळ्यात चांगला काळ असतो।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

या तलावाच्या टाक्यावर उभेहोउं जस समुद्राची लाटअसते तशी या तलावाच्या लाटेत येणाऱ्या पाण्यासोबत खेळताना अतिशय आनंद होत असतो। या टाक्यामध्ये उतरताच थंडगार पाण्यामध्ये ओलेचिंब झाल्यावर स्वतःचा विसर पडत असतो । काही वेळा साठी या निसर्गाच्या सानिध्यात स्वतःची ओळख विसरून मनाला भुरळ पडल्या सारखं होत असतो। सोबत असणाऱ्या मित्र मैत्रिणीनं साठी हा तलाव एक वेगळा अनुभव देऊन जातो। एक अविस्मरणीय आठवण बनताना दिसत असते। येथे टाक्यावरून पाण्यामध्ये अनेक प्रकारच्या उड्या मारताना पर्यटक स्वतःला काही वेळा साठी विसरत असतात। असा हा झाडीपट्टी परिसरातील एक सगळ्यात महत्वाचा पर्यटन स्थळ। जो संपूर्ण आयुष्यामध्ये आठवणीत राहत असतो। सोबतच प्रत्येक पावसाळ्यात याची आठवण येत असते।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

ghodazari waterfall


या तलावावरून काही अंतरावर हिरव्यागार झाडामध्ये छोटे छोटे पाण्याचे प्रवाह वाहताना दिसते। काही अंतरावर गेले असता या प्रवाहाचा वेग वाढू लागतो तसेच या प्रवाहामुळे अनेक वॉटरफॉल तयार होत असतात। या कडे पर्यटकांचे विशेष लक्ष जात नसते। परंतु काही पर्यटक इथे सुद्धा जात असतात। आणि या वॉटरफॉल्स चा आनंद सुद्धा लुटणाट्णा दिसतात। इथे मुख्यतः फोटोशूट करताना पर्यटक दिसतात। या पाण्याच्या प्रवाहामुळे दगडांच्या बाजूला अनेक पर्यटक फोटो शूट करत असतात।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

इथून समोर उजव्या वळणाला पर्यटक मोठी गर्दी करताना दिसतात। या पर्यटमध्ये भर घालण्याकरिता बोटिंग सुविधा सुरु करण्यात आलेली दिसून येते। इथे साधारण छोट्या बोट्स चा वापर करून पर्यटकांना तलावाचा मध्यभागी नेहून संपूर्ण तलावाचे देखावा दाखविल्या जातो । बोट वरून जात असताना काही सेफ्टी जॅकेट सुद्धा दिल्या जाते या कारणाने येथील बोटिंग सुविधा सुरक्षित मानली जाउ शकते। इथे सायंकाळच्या वेळेस सूर्यास्त बघताना तलावाच्या काठावरती सूर्याचा किरणांनी सर्वत्र पसरलेला केशरी रंगासोबत तलावामध्ये उमटलेले प्रतिबिंब बघताच निसर्गातील एका अविस्मरणीय क्षणाचा समारोप होत असतो।.

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

महत्वाची सूचना : इथे पावसाळ्यात येत असताना एखादी जास्तीचा ड्रेस सोबत आणावा तसेच हे पर्यटन स्थळ अतिशय नैसर्गिक असल्यामुळे इथे शक्यतो प्लास्टिक चा वापर करून परिसरामध्ये फेकू नये। तसेच पाण्याची पातळी जास्त असल्यास शक्यतो दुरून या स्थळाचा आनंद घ्यावा। .

ghodazari-dam-and-wildlife-sanctuary

अशाच आणखी पर्यटनाचा मराठीतून शब्दरूपी अनुभव घेण्या करीता तसेच आपल्या ज्ञानात भर पाळण्या करीता आमच्या दुसऱ्या पोस्ट ला नक्की भेट द्या। .

popular city and place