futala-lake-nagpur-maharashtra

फुट्टाला तलाव

futala-lake-nagpur-maharashtra

नागपूर मधील एक मुख्य आकर्षणा पैकी एक म्हणजे फुट्टाला तलाव। नागपूरच्या मध्यभागी म्हणजेस सीताबर्डी पासून अमरावती रोड ला 6 किलोमीटर अंतरावर असलेलं एक निसर्गरम्य तलाव म्हणजे फुट्टाला। या तलावाच्या आजूबाजूचा परिसर नागपूर येथील पर्यटकांसाठी जणू मुंबईचा नरिमन पॉईंट। येथे पर्यटक हजारोंच्या संख्येने रोज सायंकाळी येत असतात। फुट्टाला हे नागपुरातील पर्यटकांसाठी जणू एक मोकळा स्वास घेण्याचे ठिकाण आहे।.

futala-lake-nagpur-maharashtra

फुट्टाला तलावाचा इतिहास

नागपूर मध्ये 18 व्हा शतकात मराठा साम्राज्याचे राजे भोसले यांचा शासन काळ होता। 60 एकर मध्ये पसरलेल्या या तलावाची निर्मिती याच शासन काळात झाली होती। जवळपास आजपासून 200 वर्ष पूर्वीचा हा तलाव असल्याचे कळते। या तलावाच्या बाजूला असलेली पहार हि दगडाची असल्याचे दिसून येथे। मिळालेल्या माहिती नुसार २००३ मध्ये या तलावाचे जीर्णोद्धाराचे काम सुद्धा करण्यात आल्याचे कळते। .

futala-lake-nagpur-maharashtra

तलावाची सुंदरता

या तलावाच्या परिसरामध्ये पोहचताच तलावाच्या किनाऱ्यावर वाहणारा थंडगार वारा शरीराला स्पर्श करत असतो। या मध्ये पावसाळा किंवा हिवाळा असल्यास अतिशय थंड गार वारा तलावाकडे आकर्षित करत असतो। सायंकाळच्या वेळेस सूर्याच्या अस्ताला येथील मनमोहक दृश्य अविस्मरणीय असते। तलावाच्या उजव्याबाजूला हिरवीगार झाडी, दूरवर पसरलेले तलावाचे पाणी यामध्ये पडणारे सूर्याची किरणे, निळ्या आकाशामध्ये कापसाच्या आकारासारखे वाटणारे पांढरे शुभ्र ढग बघताच अतिशय आनंद होत असतो। असे हे तलावाचे सौंदर्य कदाचितच विसरता येणारे आहे।.

futala-lake-nagpur-maharashtra

या तलावाला रस्त्यापासून खालच्या परिसरामध्ये जाण्याकरिता काही दगडांच्या पायऱ्यांची वेवस्था असलेली दिसते। याच्या कडेला अनेक फुल झाडांची लागवड इथे करण्यात आलेली आढळते। तसेच इथून खाली गेले असता तलावाच्या सभोवताली फिरण्याकरिता तसेच बसण्या करीत परिसर तयार करण्यात आल्याचे कळते। इथे अनेक पर्यटक फिरण्याकरिता येत असतात। या शिवाय इथे 15 फूट उंच उडणारे दोन रंगीबे रंगी फवाऱ्यांसोबत एक अतिशय उंच जवळ पस 100 फूट उंची पर्यंत उडणारा फवारा लावण्यात आलेला आहे। हे फवारे बघताच मनाला खूब जास्त आनंद होत असतो।.

futala-lake-nagpur-maharashtra

फुटला तलाव येथे येण्याचा योग्य काळ

पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू या तलावाला भेट देण्यासाठी अतिशय उत्कृस्ट काळ आहे। हा तलाव नागपूरकारणांसाठी प्रमुख स्थळ असल्याने या परिसरामध्ये नेहमी गर्दी बघायला मिळते। तसे बघितल्यास इथे रोज किमान 1000 पर्यटक येत असतात। या तलावाचे सौंदर्य हे पावसाळा तसेच हिवाळा या ऋतू मध्ये अधिक असल्याचे दिसते। पावसाळ्यामध्ये सुरवातीच्या काही दिवसामध्ये रिमझीम पावसामध्ये दुपारी 12 वाजल्यापासूनच पर्यटकांची गर्दी व्हायला सुरवात होते। या रिमझीम पावसात सर्वत्र ओलाचिम्ब झालेला परिसर ,जोराने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत उसळणाऱ्या तलावाच्या लाटा बघताना सोबत गरम गरम मक्याचे कणीस खाण्याचा आनंद एक वेगळं अनुभव देऊन जातो। कदाचितच घडणाऱ्या या क्षणाचा कोणाला विसर पडत असतो। .

futala-lake-nagpur-maharashtra

हिवाळा ऋतूत या परिसराचे महत्व दुप्पट होते। पावसाचे प्रमाण कमी होताच इथे पर्यटकांच्या गर्दीचे प्रमाण अधिक होताना दिसते। ऑफिस च्या कामाचा रोज रोज केल्याने कंटाळा आल्यावर म्हणाला शांतता देणारे ठिकाण म्हणून फुट्टाला कळे बघण्याचा दृष्टीकोन पर्यटकांमध्ये दिसून येत असतो। इथे अनेक अशा हॉटेल्स ची सुद्धा व्यवस्था केलेली दिसते। सोबतच इथे अनेक प्रकारचे छोटी छोटी दुकाने दिसत असतात यामध्ये चॉकलेट विकणारे सुद्धा दिसते। इथे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पर्यटकांची खूब जास्त प्रमाणात गर्दी होत असते। इथे अनेक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन होताना दिसते। या परिसरामध्ये रविवार ला गर्दीचे प्रमाण अधिक पूर्ण दिवस इथे पर्यटक येत असतात तसेच इथे येण्याचा योग्य वेळ हा सायंकाळचा असतो यामध्ये 6 ते 10 हा वेळ अतिशय उत्तम असल्याचे कळते।.

futala-lake-nagpur-maharashtra

आमच्यासोबत आलेले अनुभव

एखाद्या शहरातील पर्यटनाला जाण्याकरिता संपूर्ण तयारी महत्वाची असते। या पर्यटनाची माहिती मिळताच आमच्या संपूर्ण टीम मध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। आमच्या टीम मध्ये सर्व युथ असल्याने हे पर्यटन सर्वांसाठी आकर्षण होते। अनेकांनी आपले कॅमेरे तसेच मोबाइलला ला लागणारे ग्याजेटस ची खरीदी सुद्धा केली या मध्ये अनेकांनी ट्रायपॉड, मोबाइलला कॅमेरा लेन्सस ,सेल्फीस्टिकस अशा प्रकारच्या वस्तू ऑनलाईन माघितल्या। या सर्व वस्तूंचा वापर करून उत्तम अशा चित्रीकरणांसोबत कायम आठवणीत राहणाऱ्या क्षणाची सुरवात होणार होती।
चंद्रपूर वरून नागपूरला पोहचताच, अमरावती या मार्गाने काही अंतरावर हे पर्यटन असल्याचे कळले । इथून भारतनगर चवकातून काही अंतर समोर गेल्यावर उजव्याहाताला वळण घेतले काही क्षणातच दूरवर पसरलेला तलावाची एक उत्तम दृश्य नजरेस पडते । इथून समोर जाऊन काही अंतरावर आम्ही थांबलो । तलावाच्या डाव्याबाजूला काही अंतरावर गाडी ठेवण्याकरिता जागा मिळाली। सायंकाळचे 6 वाजले होते पर्यटकांची गर्दीवायला सुरवात झाली होती रविवार असल्याने सुट्टीची मज्या घेण्याकरिता पर्यटक येऊ लागले होते। काही क्षणातच येथील संपुर्ण परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता। अनेक फेरीवाल्यांची येजा सुरूझाली यामध्ये चॉकलेट्स ,वेपेर्स अशा अनेक गोष्टी घेऊन येत होते। पर्यटक अशा गोष्टींचा आस्वाद घेताना दिसत होते। हिवाळ्याचे दिवस असल्याने अंधार व्हायला लवकरच सुरवात झाली।.

futala-lake-nagpur-maharashtra

सायंकाळचे 7 वाजले तलावाच्या मध्यभागी असलेला फवारा सुरु करण्यात आला। संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले लॅम्प्स सुरु करण्यात आले। बघता बघता अनेकांचे सेल्फीसेशन सुरु झाले। पर्यटक फोटो काळण्यामध्ये मग्न झालेले दिसत होते। यामध्ये नवयुवक -युवतींचा अधिक प्रमाणात समावेश असल्याचे दिसून येत होता , कोणी जोडीने तर कोणी फॅमिली सोबत या ठिकाणी आनंद घेताना दिसत होते। इथे प्रत्येक व्यक्ती काही वेळासाठी चिंतामुक्त होण्या करीत येत असतो। अनेकांसाठी फुटाळा तलाव म्हणजे एक प्रसन्नता प्रदान करणारे स्थळ आहे। काही वेळा नंतर या परिसरामध्ये काही लेकसाईड रेस्टोरंट आणि चायनीज चे स्टाल याकडे पर्यटकांची गर्दी होताना दिसली।
अशा ठिकाणी या स्टालला अधिक प्रतिसाद मिळताना दिसत होता। पर्यटक या स्टाल कळे सुद्धा आकर्षित होताना दिसत होते। या ठिकाणी मोकळ्या हवेत पर्यटक गप्पा मारताना दिसत होते। या परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे प्रशासनाने सुरक्षे करिता विशेष पोलीस पथकाची नेमणूक केलेली दिसते। इथे पोलीस नेहमी फिरताना दिसतात। या मुळे हे स्थळ सुरक्षित असल्याचे दिसते।.

futala-lake-nagpur-maharashtra

महत्वाची माहिती

या पर्यटन स्थळी येत असताना टुव्हीलर तसेच फोरव्हिलर पार्किंग क्षेत्रात पार्क करावी। इथे नेहमी पोलिसांची गाडी फिरत असते जी गाडी नो पार्किंग समोर असते त्यावर फाईन केल्या जातो, या कडे विशेष लक्ष ठेवावे।.

futala-lake-nagpur-maharashtra

फुटाळा तलावा जवळील स्थळे

फुटाळा तलावा जवळच असलेले बोटनिकल गार्डन हे सुदा नागपूर मधील पर्यटन स्थळान पैकी एक आहे। तलावाच्या काठावर असलेले हे गार्डन अतिशय सुंदर आहे। या गार्डन मध्ये अनेक रंगेबिरंगी फुलझाडी आहे। हे गार्डन फुटाळा तलाव पासून काही 100 मीटर अंतरावर आहे। इथे जाण्यासाठी दिवसाचा वेळ योग्य आहे। सेमिनरी हिल परिसर हा सुद्धा फुटाळा तलावापासून जावेद असलेले एक मुख्य आकर्षण आहे। इथे संपूर्ण परिसर फिरण्याकरिता पर्यटकांसाठी छोटयाश्या रेल्वे गाडीचा उपयोग केला जातो, छोट्या मुलांसाठी हे स्थळ अतिशय योग्य आणि सुंदर आहे। .

popular city and place

famous-temple-in-nagpur

famous-temple-in-nagpur

नागपूर येथील प्रसिद्ध मंदिर

jamsavli-waterfall

jamsavli-waterfall

जामसावली वॉटरफॉल | jamsavli ke hanuman

Salbardi-from-nagpur

Salbardi-from-nagpur

नागपूर ते सालबर्डी

futala-lake-nagpur-maharashtra

futala-lake-nagpur-maharashtra

फुट्टाला तलाव

dwarka-water-park-nagpur-entry-fees

dwarka-water-park-nagpur-entry-fees

द्वारका वॉटर पार्क