best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

महाराष्ट्र राज्य हे मुख्यतः उद्योगिक क्षेत्रासाठी ओडखल्या जाणार राज्य आहे। परंतु इथे अशे काही पर्यटन स्थळे आहेत जिथे पर्यटक आवर्जून एकदा तरी हजेरी लावतात। यातीलच काही स्थळे आपण या लेखामध्ये बघणार आहोत। महाराष्ट्र म्हटलं कि सह्यांद्री पर्वत रांगा आणि सातपुडा पर्वत रांगा आल्याचं। याच पर्वत रांगावरती अनेक अशे प्रसिद्ध असलेले थंड हवेची ठिकाणे वसलेली आहे। .

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

1.महाबळेश्वर: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओडखल्या जाते। महाबळेश्वर हे अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे। सह्यांद्रीच्या घाटात वसलेले सुंदर असे स्थळ आहे। इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते विशेषतः हिवाळ्यातील गारवा अनुभवासाठी पर्यटक येत असतात। इथूनच कृष्ण नदीचा उगम झाला आहे। यासोबतच इथे अनेक पॉईंट्स आहे जिथे पर्यटक सनसेट बघण्याकरिता जात असता। महाबळेश्वर हे पश्चिम घाटात वसलेले एक गाव आहे इथे पर्यटन मध्ये नवीन उत्साह बघण्याकरिता मिळत। महाबळेश्वर मध्ये वातावरण थंड असल्यामुळे इथे अनेक प्रकारच्या फळांचे पिके घेतली जातात। यामध्ये स्ट्रॉवबेरी हे मुख्य पीक आहे। तसेच इथे रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे प्रसिद्ध आहेत। इथे पर्यटक या फळांचा आस्वाद घेताना दिसतात। महाबळेश्वर इथे महादेवाचे मंदिर आहे। हे मंदिर 13 व्हा शतकातील असल्याचे कळते। सोबतच इथे अनेक मंदिरे आहेत यामध्ये पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर हे मुख्य आहे। इथे काही पॉईंट्स आहे मंकी पॉइंट आर्थर सीट पॉइंट वेण्णा लेक (वेण्णा तलाव) केइंटटस् पॉईंट नीडल होल पॉइंट / एलीफंट पॉइंट विल्सन पॉइंट प्रतापगड : महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महत्वाचा किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता। हा किल्ला महाबळेश्वर पासून अगदी जवड आहे।.

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

2.चिखलदरा: महाराष्ट्राच्या विदर्भा मध्ये अमरावती जिल्ह्यात चिखलदरा हे पर्यटन क्षेत्र आहे। हे थंड हवेचे विदर्भातील मुख्य ठिकाण आहे। चिखलदरा हे सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाट वाघ्र्य प्रकल्प मध्ये येतो। इथे नेहमी वाघाचा मुक्त संचार होताना दिसतो। इथे पर्यटक मुख्यतः हिवाळ्यामध्ये येत असतात। निसर्गासोबतच इथे जंगली प्राण्यांचे दर्शन होते। चिखलदरा येथे डोगरदरींनी वसलेले स्थळ आहे। इथे कोरकू नामक आदिवासी राहतात। येथील जंगलामध्ये अतिशय दाटीने वृक्षांची वाढ झालेली आहे। महत्वाची ठिकाण मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ढाकाना-कोलकाझ राष्ट्रीय उद्यान, चक्रीवादळ पॉइंट, प्रॉस्पेक्ट पॉईंट, देवी पॉईंट, गविलगड आणि नरनाला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन, आदिवासी संग्रहालय, समाडोह तलाव चिखलदरा व त्याच्या आसपासच्या महत्वाची ठिकाणे आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघ आहेत आणि त्यात पँथर,अस्वल, सांभर, वन्य अस्वल आणि वन्य कुत्री यासारखे इतर प्राणी आहेत..

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

3.लोणावळा: पुणे शहरापासून जवड असलेले एक मुख्य पर्यटन स्थळ म्हणजे लोणावळा। येथील सह्यांद्रीच्या पर्वत रांगा,सोबतच असलेले धबडबे , छत्रपती शिवाजी महाराज याच्या काळातील किले आणि येथील प्रसिद्ध असलेली चिकी मनाला मोहून घेत असते। एवढ्या सांगड्या गोष्टी लोणावळा या ठिकाणी मिळत असतात। लोणावळ्यातील लोहगड येथून दिसणारा सूर्यास्त पर्यटकांसाठी एक विशेष भेट आहे।
महत्वाची ठिकाणे
राजमाची पॉईंट राजमाची पॉईंट लोणावळ्यापासून 6..5 किमी अंतरावर आहे. हा पॉईंट शिवाजी महाराजांचा किल्ला, राजमाची (रॉयल टेराकोइज) आणि आजूबाजूच दृश्य दर्शवितो. राज्य परिवहन बसेस राजमाची पॉईंट ते लोणावळा दरम्यान चालतात.
राजमाची किल्ला राजमाची किल्ला हा लोणावळा जवळील ऐतिहासिक किल्ला आहे आणि पावसाळ्यात या ठिकाणी बरेच ट्रेकर्स आकर्षित होतात. या किल्ल्यात याशिवाय, रात्रीच्या वेळी परिसर पेटविणासाठी हा किल्ला ओळखला जातो.
रायवुड पार्क आणि शिवाजी उद्यान लोणावळा येथे ही एक विस्तृत बाग आहे. बागेत बरीच उंच झाडे आहेत - त्यापैकी काही खूप जुनी आहेत.उद्यानात एक जुने शिव मंदिर आहे.
वाळवण धरण वाळवण धरण ही ब्रिटीशने बांधलेली बाग असून ती शतकाहून अधिक जुनी आहे. या धरणाच्या भिंतीच्या पायथ्याशी एक बाग आहे, आणि शहरापासून 2 किमी अंतरावर आहे. सह्याद्रीच्या तळाशी असलेल्या खोपोली वीज केंद्रात वीज निर्मितीसाठी धरणात पाणीपुरवठा केला जातो.
डेलला अ‍ॅडव्हेंचर पार्क डेलला अ‍ॅडव्हेंचर पार्क हे लोणावळा हिल स्टेशनमध्ये वसलेले भारतातील सर्वात मोठे अ‍ॅडव्हेंचर पार्क आहे. हा एक मोठा थीम पार्क / रिसॉर्ट आहे. हे मुंबई आणि पुण्यातील कंपन्यांसाठी कॉर्पोरेट प्रशिक्षण गंतव्य म्हणून काम करते. हे पार्क acres 36 एकर क्षेत्रात पसरले आहे. हे एमएसएल (म्हणजे समुद्र सपाटी) पासून सुमारे 3000 फूट उंचीवर आहे. डेलला अ‍ॅडव्हेंचर पार्क जवळपास 52 साहसी क्रियाकलाप ऑफर करते.
लोणावाला तलाव शहरापासून सुमारे 1.6 किमी अंतरावर लोणावळा तलाव नैसर्गिक सभोवतालच्या प्रदेशात वेढलेले आहे.येते पर्यटक प्रामुख्याने भेट देत असतात। तसेच येथील गडावरून तलावाचे दृश्य अतिशय सुंदर दिसत असतो।.

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

4.माथेरान : महाराष्ट्राच्या मुख्य काही थंड हवेच्या ठिकाणांपयकी एक म्हणजे माथेरान। रायगड जिल्ह्यात निसर्गाच्या आचादनात वसलेले माथेरान पर्यटकांसाठी एक मेजवानी आहे । येथील निसर्गातील दाट वृक्षांचा समावेश तसेच ससे ,रानमांजर कधी बिबट्यांचे सुद्धा दर्शन होत असते। मुख्यतः पुणे तसेच मुंबई येथून पर्यटक या निसर्गरम्य परिसराला भेटी देत असतात। येथे अनेक पॉईंट्स आहे जिथून सूर्यास्त बघण्याकरिता पर्यटकांची गर्दी दिसते। १) सनसेट पॉईंट - हा मार्ग दोधाणी गावातून सनसेट पॉईंटकडे आहे. ट्रेकर्ससाठी हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे.
२) गरबेट पॉइंट रूट - हा मार्ग सागाचीवाडी येथून धोम धरणाजवळील आदिवासी खेड्यातून सुरू होतो. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून या गावाला जाता येते. हा दुसरा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. माथेरानमधील गार्बेट पॉइंट सर्वात कमी भेट देणारा बिंदू आहे कारण इतर बाबींच्या तुलनेत तो बाजारापासून खूप दूर आहे. मुख्यत: पीक हंगामातही गरबेट पॉईंटवर कोणीच नसते. पावसाळ्याच्या हंगामात गारबेट पठाराचा विस्तीर्ण भाग आकर्षण आहे.
3) रामबाग पॉइंट रूट - रामबाग पॉईंट हा वन ट्री हिल पॉईंट जवळ एक छोटा आणि लोकप्रिय बिंदू आहे. हा मार्ग रामबाग पॉईंट वरून चौक गावाजवळ पोखरवाडी नावाच्या छोट्या खेड्यात जातो. हा मार्ग पावसाळ्यात धबधब्यावरुन जातो.
4) वन ट्री हिल - रूट बेस गाव म्हणजे आंबेवाडी गाव. आंबेवाडी पोखरवाडी गावाजवळ आहे, जिथून रामबाग पॉईंटकडे जाणारा मार्ग सुरू होतो. रामबाग व वन ट्री हिल मार्गावरुन जाताना मॉर्बे धरणाचा पाण्याचा देखावा आहे.
5) विकतगड मार्ग- हा मार्ग सर्वात कठीण आहे. या मार्गास उच्च सहनशक्ती आवश्यक आहे. हे गाव ममदापूरच्या बेस गावातून सुरू होते आणि विकतगड किल्ल्यामार्गे माथेरानला जाण्यासाठी सुमारे hours तास लागतात.
अशी हि ठिकाणे माथेरान पासून अगदी जवळ आहे..

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

५.रामटेक : विदर्भातील नागपूर शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं एक डोंगरावरील वसलेले पर्यटन स्थळ म्हणजे रामटेक। प्रभू श्री रामाने काही काळ वास्तव्य केल्याने या स्थळाचे नाव रामटेक असे पडले। नागपूर येथील पर्यटकांची इथे नेहमी गर्दी असते। या पर्यटन स्थळाची मुख्य ओडख म्हणजे येथील सूर्यास्त। येथून दिसणारे दृश्य अतिशय सुंदर दिसत असते। खिंडसी या तलावाजवळ अनेक स्पॉट आहे जिथे पर्यटक तसेच कॉलेज मधील विध्यार्थी नेहमी भेट देत असतात। तसेच रामटेक सोबतच नागपूर येथे अनेक महत्वाची ठिकाणे आहे यामध्ये दीक्षाभूमी , ड्रॅगन प्यालेस, महाराजबाग , फुटाळा लेक, अंबाझरी लेक अशी महत्वाची ठिकाणे आहेत। .

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

६.तोरणमाळ : नंदुरबार जिल्ह्यातील अतिशय शांत परिसर म्हणून ओळख असलेले थंड हवेचे ठिकाण आहे। हे ठिकाण प्रसिद्ध नसल्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी नसते परंतु येथील निसर्ग अतिशय अप्रतिम आहे। येथील सातपुडा पर्वत रांगा बघताना मनाला अतिशय आनंद होत असतो। या ठिकाणी पर्यटकांकरिता शासनाच्या वसतिगृहाची सुविधा सुद्धा केली गेली आहे।.

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

७.माणिकगड : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या शहरालगड एक निसर्गाच्या छत्रातील ठिकाण म्हणजे माणिकगड। ह्या गडाच्या चारही दिशेला पहाड आहे। यथे दाट झाडी आहे सोबतच अनेक वन्य प्राणी देखील दिसत असतात। चंद्रपूर येथील अनेक पर्यटक इथे येथ असतात। पावसाळ्यात इथे अनेक धबधबे बघायला मिळते। या सोबतच चंद्रपूर हे ताडोबा अभयारण्याची एक प्रसिद्ध स्थळ आहे। येथे हजारो संख्येने पर्यटक येत असतात। या सोबतच आनंदवन वरोरा आणि भद्रावती एक प्राचीन शहर ज्याचा इतिहास 2000 वर्ष पूर्वी घेऊन जातो अशी ठिकाणे आहे।.

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

8.आंबोली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसर म्हणजे आंबोली। आंबोली हे महाराष्ट्रातील अत्यंतिक पाऊस पडणार्‍या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वर्षभरात सरासरी ७५० सेंटिमीटर पाऊस पडतो. आंबोली हे अत्यंत सुंदर व निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे। येथे पर्यटक थंड हवेचा गारवा अनुभवतात। सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं कि इथे समुद्रा किनारा , गडकिल्ले, आणि कोकणी लोकांचा सहवास। येथील निसर्गाचा आनंद अतिकशय उत्तम येतो। या सोबतच इथे ड्राय फ्रुट आणि नारळ पाणी याचा आनंद घेण्या करीता पर्यटक येत असतात।.

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

9.पांचगणी: महाराष्ट्रातील महाबळेश्वर वरून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेले एक अतिशय सुंदर आणि निसरगाने भरभरून असलेलं ठिकाण म्हणजे पंचगणी। पांचगणी येथे महाबळेश्वर सारखीच पर्यटकांची गर्दी बघायला मिळते। या पर्यटन क्षेत्रामध्ये 5 डोंगराचा समावेश असल्यामुळे याला पांचगणी असे नाव ठेवण्यात आले। हे ठिकाण महाराष्ट्रातील मुख्य थंड हवेच्या ठिकाण पैकी एक आहे। पाचगणी येथील गुफा आणि येथील धबधबे येथील निसर्गामध्ये भर टाकत असते। येथील धबधबे बघताना मनाला खूब आनंद मिळत असतो। या सोबतच इथे कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क हि मुख्य आकर्षणे आहेत। .

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

१०.रामदेगी :विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या तहसील मध्ये रामदेगी नावाचे एक विशेष पर्यटन क्षेत्र आहे। या पर्यटन क्षेत्राची ओडख म्हणजे इथे पावसाळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी खूब जास्त प्रमाणात असते। येथील धबधबा बघण्याकरिता लोकांची गर्दी होत असते। हे स्थळ जंगलाच्या मध्यभागी असून इथे एक मोठे पहाड आहे। या पहाडी वरून निसर्गाचे मुख्य दर्शन होत असते। येथील घनदाट वृक्ष आणि जंगली प्राणी बघण्या करीत पर्यटक येत असतात। या पहाडावर अनेक मंदिरे आहे। सोबतच येथून दिसणारा सूर्योदय अतिशय मनाला भावणारा आहे। या सोबतच मुक्ताई धबदबा, घोडाझरी तलाव अशी अनेक स्पॉट या क्षेत्राजवड येत असतात। जिथे पर्यटक आवर्जून भेटी देत असतात। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक अशी स्थळे आहे जिथे पर्यटक येत असतात यामध्ये असोलामेंढा तलाव,सोमनाथ मंदिर, अजयपूर अशी अनेक स्थळे आहे। .

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

11.हाजरा फॉल : विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील हिवाळ्यातील एक प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ म्हणजे हाजरा फॉल गोंदिया येथील दरेकसा तालुक्यात स्तिथ आहे। नागपूर वरून अवघ्या 33 किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे। येथील उंच डोगरावरून पाण्याच्या वेगाने पडणारा धबदबा बघण्याकरिता पर्यटक महाराष्ट्रातूनच नवे तर तेलंगणा आणि मध्यप्रदेशातून सुद्धा येत असता। येथील सातपुढा पर्वत रांगा त्यावरील निसर्गाची हिरवीगार गादी आणि हिवाळ्यामधील गारवा म्हणाला शहारून टाकत असतात। निसर्गप्रेमींना करीत एक विशषेश असलेले हाजरा फॉल ही निसर्गाची देणगी आहे। या क्षेत्रामध्ये अति दुर्गम भाग असल्याने इथे आदिवासी लोकांचा वावर होताना दिसतो। या सोबतच गोंदिया जिल्ह्यात कचारगढ, नागझिरा अभयारण्य तसेच नवेगाव राष्ट्रीय उद्यान हि महत्वाची पर्यटन स्थळे आहे।.

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

12.सहस्त्रकुंड धबधबा: मराठवाडा आणि विदर्भ प्रदेशाच्या सीमेवर वसलेला आहे. धबधब्याच्या क्षेत्राचा एक भाग जिल्ह्यातील उमरखेड तहसील अंतर्गत व्यापलेला आहे आणि इतर भाग नांदेड मराठवाडा विभाग जिल्ह्यातील किनवट तहसील अंतर्गत येतो. पावसाळ्यात मोठ्या संख्येने लोक या धबधब्याला भेट देतात. पर्यटक 40 फुटांपर्यंत पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेतात, संपूर्ण पर्यटकांत छोटे थेंब पसरतात आणि पाण्याचा आवाज पाहणा प्रचंड आनंद देतात. धबधब्याच्या काठावर एक सुंदर बाग आहे. विविध प्रकारचे फुलपाखरे त्यांच्याकडे अभ्यागतांना आकर्षित करतात. तेलंगणा राज्यातील जवळील आदिलाबाद जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येने नियमित भेट देतात. यात्रेकरूंना आकर्षित करण्यासाठी पंचमुखी महादेव मंदिरही आहे..

best-tourist-places-in-maharashtra-for-couples-during-winter

अशी हि काही ठिकाणे आहेत जिथे महाराष्ट्रातील निसर्गासोबतच अनेक विविधता तसेच येथील परंपरा आणि लोकवस्ती बघायला मिडत। प्रत्येक ठिकाण हे एक वेगड आहे प्रत्येकाची एक विशिष्ट ओळख आहे। या सोबतच अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत तर काही धार्मिक ठिकाणे सुद्धा आहेत जिथे पर्यटक तसेच भाविक भेटी देत असतात।.

popular city and place