महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहे। आमच्या सर्वे नुसर प्रत्येक पर्यटनाची एक खास ओळख आहे। महाराष्ट्र हे विविध प्रकारच्या पर्यटन क्षेत्राने नटलेले राज्य आहे। या मध्ये प्रत्येक पर्यटन क्षेत्र एक विशिष्ट भूमिका बजावत असतो। प्रत्येक पर्यटन ठिकाण काही कालावधी साठी उत्तम पर्यटन ठरत असतो। यामध्ये विशेषतः थंड हवेच्या ठिकाणांमध्ये प्रमुख असलेले महाबळेश्वर एक उत्तम असं पर्यटन स्थळ आहे । महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून याची ओळख आहे| जर उन्हाळ्याचा काळ असला तर विदर्भातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा अंधारी वाघ्र्य प्रकल्प एक प्रमुख आणि अतिशय उत्तम असं पर्यटन स्थळ आहे। अशाच प्रकारे हिवाळा ,पावसाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये विविध पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दीमुळे लोकप्रिय होत असतात। या लेखामध्ये या ऋतूंसोबत तुलना करून विशिष्ट कालावधी मध्येही उत्तम असणारे पर्यटन स्थळाची माहिती होणार आहे। यामध्ये प्रत्येकी 3 अतिशय उत्तम पर्यटन स्थळांची माहिती आपल्याला होणार आहे। उन्हाळ्याचा कालावधी संपत असताना पावसाची सुरवात होत असते। रिमझीम पावसाच्या सरी,अचानक येणार पाऊस मनाला अतिशय आनंद देत असतो या सोबतच उन्हाच्या उष्णतेमुळे संपूर्ण परिसराला थंडाव्या मध्ये परिवर्तित करीत असतो। निसर्गाच्या या क्षणाची संपूर्ण जीवनश्रुष्टी वाट बघत असते। हि वेळ सर्व प्राणी ,पक्षी तसेच सर्व सजीव घटकांना अतिशय आनंदमय करत असते। काही कालावधी सतत येणाऱ्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ओलेचिंब होत असते। या कालावधीत नदी,नाले तुडुंम्ब भरून वाहत असतात। या सोबतच अनेक ठिकाणी धबधब्यांची निर्मिती होताना दिसते। असाच एका अनोखा धबधबा नाणेघाट रिव्हर्स वॉटरफाल पावसाळ्यातील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे।.
काही काळ गेल्यावर पावसाच्या सरी बरसल्या काही दिवसातच सर्व नदी नाल्याला पूर येऊ लागले आणि आमच्या चेकलिस्ट मध्ये असलेले नाणेघाट धबधबा बघण्याकरिता आम्ही जाण्याचा प्लॅन तयार केला। अतिशय ओल्याचिंब झालेल्या वातावरणामध्ये प्रवास करणे आकर्षणाचा विषय ठरत असतो। या क्षणाला अविस्मरणीय बनवण्या करीता फोटोशूट एक महत्वाचा विषय असतो। याची तयारी मी आणि माझ्या टीमने मिळून केली आणि प्रवासाला सुरवात केली।.
पुण्याहून NH60 मार्गाने जुन्न्नर वरून काही अंतरावर हे स्थळ आहे। इथे जाण्याकरिता आम्ही कॅब केली। इथे जात असताना अनेक असे लँडस्केप दिसत होते। आम्ही तिथे फोटो शूट करत होतो। छोटे तलाव ,नाले, पाण्याने भरून वाहत होती ,सुंदर असे निसर्गरम्य दृश्य दिसत होती। मन अगदी प्रस्सन होत होते। या स्थळाच्या काही अंतरावरून मोठे डोंगर नजरेस दिसत होते। अतिशय उंच असलेले हे डोंगर ढगांच्या अगदी जवळ असल्याचे दिसत होते। इथूनच हा धबधबा वाहतो असे समजते। .
एखाद्या सिनेमातील रोमँटिक सीन शूट होणार असे हे अतिशय अप्रतिम दिसणारे दृश्य बघून मन भाराहून जात होते। निसर्गाचे अनेक रूप बघितली परंतु असे काही दिसणारं असे स्वप्नात सुद्धा विचार न येणारे दृश्य होते। या परिसराला बघताच अनेक गोष्टी विसरून फक्त याच दृश्य कळे बघत राहावे असे वाटत होते। अतिशय उंच असलेले डोंगर इथून वाहणारा धबधबा याचा बाजूला पावसाचे ढग एक मनमोहक दृश्य होत। या उंच डोंगरावर जाऊन जवळून या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्याचे आम्ही ठरवले। .
या डोंगरावर ट्रेकिंग करत आम्ही पुढे निघालो वाटेत एक छोटेसे गाव दिसले तिथून आम्ही काही स्नॅक्स सोबत घेतली आणि समोर निघालो ,डोंगराच्या भाग अतिशय ओला झालेला होता। यावर अनेक वनस्पति आणि गवत दूरवर पसरलेले ,सगळीकले हिरवळ निसर्ग सौंदर्य दिसत होते या गावात अनेक पाळीव प्राणी होते आणि छोटीसी वस्ती सुद्धा होती। डोंगराच्या सर्वात उंच भागावर आम्ही आलो आणि पाण्याचे अनेक शितोळे उंच उठताना नजरेस पडले। हा सर्व प्रकार बघताना एक विचित्र असं चित्र नजरेस येत होते। .
डोंगरावर पडलेले पावसाचे पाणी स्वतःची वाट शोधत उंचावरून खाली जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु येथील उंची खूब जास्त असल्याने इथे हवेचा दाब पडून हवा डोंगराला लागून वरच्या बाजूला येत होती या हवेच्या दाबाने खाली पडणाऱ्या पाण्यावर दाब बनून पाण्याचे शिंतोळे वरच्या बाजूला फेकल्या जात होते। या कारणाने या धबधब्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झाले आहे आणि याला रिव्हर्स वॉटरफ़ॉल म्हणून ओळख सुद्धा प्राप्त झाली। दिवसेन दिवस या धबधब्याची प्रसिद्धी वाढलेली दिसत आहे। हे पर्यटन स्थळ खरंच एक उत्तम असं पावसाळ्यातील पर्यटन स्थळ आहे।.
काही वेळ आम्ही वरच्याच बाजूला फिरलो आणि छोट्या छोट्या डबक्या मध्ये एवढ्या उंचावर छोटे मासे सुद्धा दिसत होते। हा प्रश्न आमचा खूब विचार करून सुद्धा कायमचा गुलदस्त्यातच राहिला। या सोबतच पुण्याच्या जवळील अनेक ठिकाणे आम्ही फिरलो आणि या ऋतूमध्ये अनेक अशे वॉटरफॉल सुद्धा बघितले। .
या धबधब्यला बघण्याकरिता आमच्या टीम ने प्रवास सुरु केला। पुण्याहून जात असताताना अनेक डोंगर दरी नजरेस पडत होत्या इथेच कात्रज चा घाट सुद्धा दिसला। या घाटातून जात असताना एक बोगदा येतो आणि खूब जास्त काळोख होत असतो। साताऱयाला जात असताना पुणे-बंगलोर या मार्गाचा वापर करावा लागतो। साताऱ्याहून हा वॉटरफ़ॉल 28 किलोमीटर अंतरावर आहे। सातारा म्हटलं कि छत्रपती शाहू महाराजांची आठवण होत असते। इतिहासाच्या अनेक पानांवर शाहूमहाराजांची कारकिर्द्ध सोनेरी अक्षराने लिहिल्या गेली आणि सातारा जिल्हा याला विशेष महत्व प्राप्त झाले।.
इतिहासाप्रमाणे वर्तमान काळात निसर्ग पर्यटनासाठी सातारा जिल्हा अतिशय लोकप्रिय आहे। या जिल्ह्यामध्ये पोहचताच अनेक अशा गोष्टी दिसल्या जिथून इतिहासातील काळाची आठवण होत होती। या जिल्ह्यतून समोर जात असताना आम्ही धबधब्यकडे जाण्याचे ठरवले त्या आधी थोडा ब्रेकफास्ट वगरे आटोपला आणि समोर प्रवास सुरु केला काही क्षणातच बोलताबोलता या धबधब्याच्या ठिकाणी पोहचलो। .
या संपूर्ण क्षेत्रामध्ये वातावरण अतिशय ओले चिंब झालेले दिसत होते आणि पावसाची रिमझीम सतत होत होती। इथून समोर जाऊन माहिती कक्ष होते आणि तिथून आम्ही माहिती घेतली तिथे असे कळले कि उजव्या आणि डाव्या रस्त्याला दोन्ही बाजूनी वॉटरफ़ॉल आहे। एका बाजूला छोटा वॉटरफ़ॉल आहे जिथे 300 वर्षां पूर्वीची गुफा आहे आणि या वाटेरफ़ॉल चे थोडे जवळून सुद्धा बघता येतो। आम्ही इथं आधी जाण्याचं ठरवलं आणि त्या दिशेने निघालो।.
संपूर्ण क्षेत्रामध्ये पायवाटेची निर्मिती दिसत होती। या वाटेरफ़ॉल च्या जवळ आम्ही पोहचलो अतिशय सुंदर असा हा वॉटरफ़ॉल होता याच्या खालच्या बाजूलाच गुफा देखील होती। या फुफेच्या आतमधून सुद्धा वॉटर फॉल बघता येतो। इथून आम्ही मोठ्या वॉटरफ़ॉल कळे निघालो। वाटेत अनेक असे छोटे छोटे वॉटरफ़ॉल समूह दिसत होते काही दूर गेल्यावर जोरदार पाण्याच्या उंचावरून खाली पडण्याचा आवाज कानावर येऊ लागला आणि काही वेळातच अतिशय उंचावरून पांढरे शुभ्र पाणी खाली पडताना दिसत होत। अतिशय मनमोहक असं दृश्य नजरेस दिसत होते फक्त बघतच राहावं असं वाटत होत। असा हा महाराष्ट्रातील सुंदर वॉटरफ़ॉल पैकी एक म्हणजे ठोसेघर वॉटरफ़ॉल आहे। या क्षणाची आठवण राहण्याकरिता सेल्फी सेशन सुरु झाले। अनेक असे लँडस्केप सुद्धा शूट करण्यात आले। .
पर्यटन स्थळे