amba-khori-picnic-spot-distance-from-nagpur

नागपूर वरून 44 किलोमीटर अंतरावर पेंचनदीच्या जवळ असलेले आंबा खोरी नावाचा अतिशय सुंदर असा धबधबा आहे। इथे येण्याकरिता कोराडी किंवा कामठी या शहरावरून यावे लागते। विदर्भातील पेंच प्रकल्प हा अतिशय प्रसिद्ध आहे। इथे पर्यटकांची नेहमी गर्दी होताना दिसते। या सोबतच पेंचनदीवरील आंबा खोरी नावाचा धबधबा अतिशय आकर्षक तसेच लॉकप्रिय आहे। पावसाळ्यात या धबधब्याला एक विशिष्ट सुंदरता प्राप्त होत असते। या धबधब्यावर पर्यटक नागपूर सोबतच अनेक दुसऱ्या ठिकाणाहून सुद्धा येत असतात।.

amba-khori-picnic-spot-distance-from-nagpur

नागपूर पासून हे निसर्ग पर्यटन अगदी जवळ असल्याने इथे पावसाळ्या आणि हिवाळ्यात सुद्धा पर्यटक येताना दिसतात। या मध्ये मुख्यतः कॉलेज मध्ये शिकत असणारे विध्यार्तीचा समावेश दिसतो। सोबतच इथे फॅमिली पिकनिक स्पॉट म्हणून येत असतात। इथे येत असताना बाईक ने आल्यास निसर्गातील अनेक गोष्टीचा आनंद घेता येतो। येथील घनदाट वृक्ष या पर्यटनाची शोभा वाढवत असते। पावसाच्या रिमझीम सरी हवेतील गारवा सोबत दगडावर पडणाऱ्या पाण्या पासून उडणारे शिंतोळे बघताना मन अगदी हरवून जात असत।.

amba-khori-picnic-spot-distance-from-nagpur

amba khori the magical waterfall


निसर्गाचा निमिर्ती मुळे एखाद्या चित्रपटातील पडद्यावर मागच्या बाजूला झडकणार दृश्य दिसावा तसा हा धबधबा दिसत असतो। अतिशय स्वछ पाण्याची शेवाळ लागून हिरवीगार दगडांवर पडणारी धार बघताच मन प्रफुल्लीत होत असत। या दृश्याला बघताच या धबधब्याच्या पायथ्याशी जाण्यापासून स्वताला कोणीच थांबवू शकत नाही। असा हा स्वतःकडे आकर्षित करणारा धबधबा वर्षातील जवळपास सात महिने सुरूच असतो। .

amba-khori-picnic-spot-distance-from-nagpur

या धबधब्याच्या पायथ्याशी उभे होताच थंडगार पाण्यानी संपूर्ण शरीर ओले होते। या सोबतच एका अविस्मरणीय क्षणाची सुरवात होत असते। इथे येणार प्रत्येक व्यक्ती या धबधब्याच्या पायथ्याशी जात असतो। या संपूर्ण क्षणाची आठवण राहावी या साठी प्रत्येक व्यक्ती फोटोशूट करत असतो। हे पर्यटन स्थळ फोटोशूट साठी उत्तम असल्याचे कळते। येथील प्रत्येक फोटोतील दृश्य अतिशय सुंदर दिसत असते। या कारणाने अनेक पर्यटक मुख्यतः फुटोशूट करिता येत असतात। .

amba-khori-picnic-spot-distance-from-nagpur

हा धबधबा निसर्गातील एक विशिष्ट स्वरूप प्राप्त करत असतो। या सोबत या जवळ पेंच प्रकल्प आहे येथील जंगली प्राणी सुद्धा इथे मुक्त पने वावरताना दिसतात, यामध्ये हरीण,सांबर आणि माकडांचा प्रमाण अधिक आहे। एखाद्या विकेंड किंवा सरकारी सुटीच्या काळात येते गर्दीचे प्रमाण दिसत असते। अम्बाखोरी सोबतच नागपूर जवळ अनेक धबधबे आहे। जामसावली धबधबा तसेच रामटेक, खिंडसी, अंबाझरी सारखी मुख्य पर्यटन ठिकाणे देखील आहे। पावसाळ्यात या ठिकाणांचे सौंदर्य दुप्पट होताना दिसते। अशाच अनेक प्रकारच्या पर्यटनाची शब्दरूपी माहिती करिता आमच्या दुर्सच्या लेकाची पाने वाचा आणि पर्यटनाचा आनंद घ्या।.

popular city and place