Zopla-maroti-ajaypur

Natural beauty with devotion

Zopla-maroti-ajaypur

अजयपूर हे चंद्रपूर वरून 27 किलोमीटर अंतरावरील पर्यटन गाव आहे । येथील झोपलेला मारोती या ठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे । या ठिकाणी जाण्या करता चंद्रपूर वरून मूल रोडला जावं लागते । तसेच या रस्त्यावरून जाताना जंगलाचा अनुभव होत असतो। येथे प्रवास करत असताना काही जंगली प्राणी म्हणजे रानडुकर , हरीण, नीलगाय , बंदर इत्यादी रस्ता पार करताना दिसत असतात कधी कधी वाघाचे पण दर्शन होत असते ।.

Zopla-maroti-ajaypur

चंद्रपूर वरून अजयपूरला जात असताना रस्त्याच्या डाव्याबाजूला 15 किलोमीटर अंतरावर एका मूर्तीचे दर्शन होत असते । हि मूर्ती चक 105 फुटाची आहे। हि मूर्ती हनुमानाची आहे ,मूर्ती रस्त्याच्या कडेला जंगलामध्ये चिचपल्ली या गावामध्ये आहे । अय मूर्तीच्या बाजूला छोटीसी पार्क आहे इथे काही फुलांची झाडे आहे । आजयपूरला जाताना पर्यटक इथे पण भेट देत असतात।.

Zopla-maroti-ajaypur

चिचपल्ली या गावाजवडून जात असताताना इथे काही बंदराचा वावर खूब जास्त प्रमाणात असल्याचा दिसतो । अजयपूरला जाण्या करता चिचपल्ली गावाजवडून जावं लागत , त्यानंतर उजव्या हाताला वळणावरून वळावं लागते । येथून हे पर्यटन केंद्र 3 किलोमीटर अंतरावर आहे ।.

Zopla-maroti-ajaypur

झोपला मारोती हे निसर्गरम्य पर्यटन क्षेत्र 37 हेक्टर संरक्षित वन क्षेत्र मध्ये आहे । या पर्यटन क्षेत्रा मध्ये अंधारी नदी मंदिराच्या बाजूला वाहत जाते । या नदीतील वाहत्या पाण्याचे तसेच येथील नायसर्गिक आकर्षणाचे पर्यटक मनमोहक चित्रीकरण करत असतात। .

Zopla-maroti-ajaypur

या पर्यटन क्षेत्रात लहान मुलांसाठी खेडण्याकरता झुल्यांचि व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच इथे काही प्राण्यांचे पुतडे ठेवण्यात आले आहे । येथे पर्यटकांची अक्षरशः खूब गर्दी असते । तसेच हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्वाचा पिकनिक स्पॉट आहे ..

popular city and place