Vardvinayak-Ganesh-mandir

वरदविनायक गणेश मंदिर

Vardvinayak-Ganesh-mandir

अष्टविनायक म्हणजे आठ गणपतीची रूपे हे महारष्ट्राच्या मुख्य आकर्षणा मधील एक आहे। तसेच विदर्भा मध्ये सुद्धा अष्टविनायक आहे त्यापैकी एक म्हणजे भद्रावती येथील वरदविनायक। या वरदविनायक मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील गणेशमूर्ती । अतिशय सुबक आणि उंचीला जवाडपास 7 फूट असलेली भव्य अशी मूर्ती । एवढी विशाल अशी प्राचीन गणपतीची मूर्ती कदाचितच दुसरीकडे बघायला भेटेल।.

Vardvinayak-Ganesh-mandir

हे मंदिर भद्रावती शहराच्या शेवटच्या टोकाला गवराडा या गावा मध्ये आहे। तसे विचार केल्यास हे गाव भद्रावती मधेच येते। इथे येण्याकरिता ऑटो रिक्षाची सुविधा आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करण्या आधी एका भव्य गेट मधून आत जावे लागते। या गेट मधून आतमध्ये जाताच डाव्याबाजूला एक छोटासा तलाव आहे यालाच लागून एक टेकडी आहे। मंदिर हे याच टेकडीवर स्तिथ आहे । सूर्यास्ताच्या वेडेस येथील दृश्य अविस्मरणीय असते।.

Vardvinayak-Ganesh-mandir

मंदिरामध्ये प्रवेश करण्या आधी टेकडीवर चडण्याकरिता पायऱ्या आहे। पायऱ्या चढत असताना बाजूला काही शिल्प आढळतात, दोन पहारेकरी असावेत असे दगडाच्या दोन भव्य मुर्त्या आहे। या मंदिरामध्ये प्रवेश करताच येथील वास्तुकलेवरून असे लक्षात येते कि हे मंदिर हेमाडपंती असावं। येथील शिल्प हे अतिशय प्राचीन आहे जवाडपास १३ व्हा शतकातील असावं असा अंदाज आहे।.

Vardvinayak-Ganesh-mandir

गणेश मंदिर म्हटले कि मूषक आहेच। या मंदिराच्या मध्यभागी एक मूषकाची मूर्त आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याकरिता खालच्या बाजूला पायऱ्या मधून जावं लागत यानंतर गणपतीचे दर्शन होत असते। या मंदीरामध्ये देवाचे अगदीजवडून दर्शन घेता येते। मंदिराच्या परिसरात आणखी काहि देवांच्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत। या अतिष्य प्राचीन शिल्प असलेल्या मुर्त्या आहे । तसेच टेकडीच्या पायथ्यला समोरच एक हनुमानाचे मंदिर आहे। याला लागूनच एक विहीर आहे। येथील परिसरात एका बागेची निर्मिती करण्यात आलेली आहे।.

Vardvinayak-Ganesh-mandir

भारतामध्ये गणेश चतुर्थीला गणेशउत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या गणेश उत्सवाची सुरवात स्वतंत्रकाडापूर्वी लोकमान्य टिळकांनी केली। लोकांमध्ये एकोपा निर्माण होऊन क्रांतीची ज्योत पेटावी हा त्याचा मुख्य उद्देश होता। यालाच एक मोठं रूप मिडून भारतातच नवे तर संपूर्ण विश्वात हा उत्सव प्रसिद्ध झाला। या उत्सवाला बघण्या करीत बाहेर देशातून पर्यटक येत असतात। भद्रावती सारख्या अति प्राचीन स्थळांना भेटी देत असता।.

Vardvinayak-Ganesh-mandir

भद्रावती मध्ये या वरदविनायक गणेश मंदिरा व्यतिरिक्त अनेक स्थळे आहेत जी अतिशय प्राचीन आहे । यामध्ये प्राचीन बुद्ध लेणी , विदर्भातील एकमेव असलेले भद्रशेषयाचे मंदिर , गोंडराज्यातील किल्ला , तसेच शिल्पकलेने नटलेलं पार्श्वनाथ स्वामींचं जैन मंदिर , आणि जमिनी खाली गुंफेतील भवानी मातेचे मंदिर हे जगप्रसिद्ध आहे।.

popular city and place