Salbardi-from-nagpur

नागपूर ते सालबर्डी

Salbardi-from-nagpur

सालबर्डी एक उल्लेखनीय असं ठिकाण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या सीमेवर वसलेले आहे। सातपुडा पर्वत रांगेतील निसर्गरम्य क्षेत्रातील हे प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ मध्यप्रदेशातील बैतुल या जिल्ह्या मध्ये येते। महाराष्ट्रातून गेले असता अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तहसील पासून 10 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे। इथे येण्याकरिता सगड्यात जवडचे विमानतळ हे नागपूर आहे। मध्यप्रदेशचा विचार केल्यास भोपाळ येथील विमानतळ सुद्धा जवळ पडत असते। .

Salbardi-from-nagpur

सातपुडा पर्वत रांगा ह्या निसर्गातील अतिशय सुंदर निसर्ग देखावा आहे। या पर्वत रांगेवर अनेक अशा स्थळांची निर्मिती झालेली आहेत या मध्ये मेळघाटचा प्रकल्प आहे सोबतच महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांमधले एक म्हणजे चिखलदरा हे सुद्धा आहे। या व्यतिरिक्त याच पर्वत रांगेवर अनेक अशा धार्मिक पर्यटनाची सुद्धा निर्मिती झाली आहे। या मधील एक सालबर्डी , इथे महादेवाचे एका गुफेमधे प्रसिद्ध असलेले शिवलिंग आहे।.

Salbardi-from-nagpur

सालबर्डी इथे येण्याकरिता अमरावतीवरून 55 किलोमीटर अंतरावर असलेले मोर्शी या तहसील मध्ये यावे लागते। इथून येत असताना वरुड या गावाच्या जवळून सालबर्डी ला जण्यासाठी मार्ग आहे। या मार्गावरून येत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडाचा सहवास लागतो। सोबतच रस्त्याच्या विरुद्ध दिशेला अनेक पर्वतांच्या रांगा बघायला मिळते। इथे येण्याचा योग्य काळ हा हिवाळा असतो। या काळामध्ये निसर्गाच्या हिरव्याकंच रंगाने डोंगरांना एक विशिष्ट सौंदर्य प्राप्त होत असते। सोबतच जर पावसाच्या सरी असल्यास निसर्ग प्रेमींसाठी एक अविस्मरणीय आनंद देऊन जातात। इथून समोर जात असताना माळू नदी येत असते हि नदी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला वेगळी करत असते। इथून काही अंतरावरच सालबर्डी हे गाव आहे।.

Salbardi-from-nagpur

सालबर्डी या गावामध्ये प्रवेश करताच येथील रहिवासी लोकांनी अनेक प्रकारची छोटी दुकाने लावली आहे। येथे काही आदिवासी लोकांनी जडीबुटीची सुद्धा दुकाने लावलेली लक्षात येते। इथे आल्यावर एक प्रवेशद्वार बघायला मिळते या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच समोरील रास्ता हा शिवलिंग कडे जात असतो। इथे दोन नद्यांचा संघम देखील बघायला मिळतो। यातील एक नदी माळू आणि दुसरी हि गुप्त गंगा आहे। नदीचे पात्र हे मोठ्या दगडांनी भरलेले दिसते। इथे अनेक पर्यटक नदीच्या पात्रात फिरताना दिसता।.

Salbardi-from-nagpur

प्रवेशद्वारापासून सुमारे ७०० पायऱ्या चालून जावं लागते। या पायऱ्या चालत असताना सभोवतालचा परिसर अतिशय सुंदर दिसत असतो याच कारणाने इथे अनेक प्रकारचे साधू संत महात्मे राहत असत अशे येथील स्थानिक लोक सांगतात। या सोबतच इथे अनेक धर्मांची पंतांची शिल्पे सुद्धा बघायला मिळतात। या उंचीवरून संपूर्ण परिसरामध्ये फक्त डोंगरी भाग दिसत असतो। जिथपर्यंत नजर जाते तिथे तिथे फक्त डोंगर दिसत असते। .

Salbardi-from-nagpur

या डोंगरावरून शिवलिंग बघण्याकरिता एका खोल अशा गुफे मध्ये 100 पायऱ्या खाली जावे लागते इथे खाली पोहचताच एक संगमरवर दगडाने सुंदर अश्या शिल्प कलेने नटलेले अतिशय शांत अशा ठिकाणी महादेवाचे शिवलिंग आहे। याच शिवलिंगाला बघण्याकरिता भाविकांची नेहमी इथे वर्दळ होताना दिसते। महाशिवरात्र आणि नागपंचमीला इथे भव्य अशी जत्रा असते। या गुफेमधे सर्वत्र अंधार असतो इथून आणखी एक गुफा आहे परंतु इथे प्रवेश बंदी आहे। असे हे शिवलिंग अतिशय प्राचीन असलेल्या गुंफेतील शांततेत आहे। या सोबतच इथे आणखी काही स्पॉट्स आहे ज्याने सुराबर्डीच्या पर्यटनात भर पडत असते। यामधील एक म्हणजे पांडव कचेरी..

Salbardi-from-nagpur

पांडव कचेरी


पांडव कचेरी हि एक ऐतिहासिक वास्तू आहे। इथे प्रवेश केल्यावर कळते कि हे एक शिवमंदिर आहे। या परिसराबद्दल सध्या तरी प्रसिद्धी नाही। इथे अनेक प्रकारच्या लेण्या आहे। या लेण्या एका विशाल दगडाला कोरून बनल्याचे कळते। ह्या लेण्या दुसऱ्या शतकातील असाव्यात असा इतिहासात लेख सापडतो। या वास्तूमधील खांब अतिशय सुंदर अश्या शिल्प कलेने बनलेले आहे। या शिवाय इथे आणखी दोन अश्याच प्रकारच्या लेण्या आहे जिथे अशीच शिल्पे काढलेली आढळतात। असे हे निसर्गाच्या कुशीत वसलेले सालबर्डी गाव आहे। अश्याच प्रकारच्या अनेक ठिकाणांची श्ब्दरूपी माहिती साठी आमचे दुसरे लेख वाचा। .

popular city and place

famous-temple-in-nagpur

famous-temple-in-nagpur

नागपूर येथील प्रसिद्ध मंदिर

jamsavli-waterfall

jamsavli-waterfall

जामसावली वॉटरफॉल | jamsavli ke hanuman

Salbardi-from-nagpur

Salbardi-from-nagpur

नागपूर ते सालबर्डी

futala-lake-nagpur-maharashtra

futala-lake-nagpur-maharashtra

फुट्टाला तलाव

dwarka-water-park-nagpur-entry-fees

dwarka-water-park-nagpur-entry-fees

द्वारका वॉटर पार्क

About us
privacy policy

Copyright © cityinformation.world 2020

If you have any questions or suggestions then contact on the mail:cityinformation.world@gmail.com 2020