Nag-mandir-bhadrawati

भद्रनाग मंदिर भद्रावती

Nag-mandir-bhadrawati

भारतामध्ये अनेक प्रकारची मंदिर आहेत त्यामध्ये काही नागमंदिर पण आहे । महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भा मध्ये नाग देवतांची पुज्या केली जाते । विदर्भातील एकमेव असलेले भद्रनागाचे मंदिर हे भद्रावती मध्ये आहे । भद्रावती या शहराचा इतिहास हा प्राचीन आहे या शहरामधील हे 1000 वर्ष पूर्वीचे भद्रनाग स्वामी मंदिर आहे।.

Nag-mandir-bhadrawati

भद्रनाग मंदिर हे शहराच्या मध्यभागी आहे । हे मंदिर येतील लोकांसाठी ग्रामदैवत आहे । अतिशय प्राचीन असल्याने येथील मंदिराच्या परिसरात अनेक प्राचीन मुर्त्यांचा समावेश आहे । मंदिरातील मुख्य मूर्ती हि नऊ फण्याची भद्रशेषाची आहे। या मंदिराच्या बाजूला एक पुरातन कालीन विहीर आहे । येथील स्थानिक लोक सांगतात या विहिरी मध्ये शेषनाग राहतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। .

Nag-mandir-bhadrawati

या मंदिराच्या गाभाऱ्यात 36 पुरातन खांब आहेत । इथे एक शिलालेख आहे या शिलालेखामध्ये असे लिहिले आहे कि ह्या मंदिराचा ११४६ साली जीर्णोद्धार करण्यात आला । यावरून असे कडते कि हे मंदिर 1146 च्या आधी पासून अस्तित्वात होते। या मंदिराच्या आवारात भगवान विष्णूची तसेच गणेशजींची मूर्ती आहे याशिवाय इथे हनुमानाची आणि अनेक अश्या प्राचीन मुर्त्या आहे ।.

Nag-mandir-bhadrawati

या मंदिरामध्ये परराज्यातील सुद्धा भाविक येत असतात । विशेष म्हणजे तेलंगणा आणि मध्यप्रदेश येथील भाविक मुख्यतः इथे येतात । नागपंचीमी आणि महाशिवरात्री या सणाला या मंदिरामध्ये यात्रा असते। हि यात्रा या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे । इथे हजारोंच्या संख्येने देवाच्या दर्शनासाठी भाविक येतात।.

Nag-mandir-bhadrawati

भद्रावती मध्ये मुख्य भद्रनाग मंदिर असले तरी इथे अनेक महत्वाची मंदिरे आहेत । विदर्भातील अष्टविनायक मधील वरदविनायक मंदिर इथेच आहे । या शिवाय भारतामध्ये प्रसिद्ध असलेलें जैन मंदिर पण इथेच आहे । तसेच प्राचीन गोंडवाना साम्राज्यातील किल्ला भद्रावती मध्ये आहे । याव्यतिरिक्त 2000 वर्ष्या पूर्वीची बुद्ध लेणी याच शहरात आहे ।.

popular city and place