Mahakali-Mandir-chandrapur

Devotional place of chandrapur

Mahakali-Mandir-chandrapur

चंद्रपूर येथील महाकाली मंदिर अतिशय प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे। चंद्रपूरकरांची श्रद्धा असणार्‍या या मंदिरात मंगळवारी खूप गर्दी असते । चैत्र पौर्णिमेच्या वेळी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात। यात्रेदरम्यान भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या दिसत असते । हे चंद्रपूरमधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे आणि शहराचे प्रतीक म्हणून मानले जाते। मंदिरात गणपतीची , शनिदेवाची आणि हनुमणाची मूर्ती देखील दिसत असते। मंदिरात निवास व्यवस्था उपलब्ध आहे। 50 फूट उंच मंदिरात 8 खिडक्या आणि 4 दरवाजे आहेत। मंदिराच्या बाहेरील बाजूस वाघ हत्ती आणि इतर प्राणी शिल्प आहे ।.

Mahakali-Mandir-chandrapur

हे मंदिर झरपट नदीच्या एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला अंखलेश्वर शिव मंदिर आहे। पौराणिक कथेनुसार, मंदिरातील देवीची मूर्ती जरपट नदीच्या जवळ सापडली होती आणि ती राणी हिरवती यांनी आणली होती। तिच्या विनंतीवरुन तिथे मंदिर विकसित केले गेले जेथे महाकालीचे रूप सादर केले गेले। महाकाली मंदिर हे चंद्रपूर शहरातील एक पवित्र मंदिर आहे।.

Mahakali-Mandir-chandrapur

हे भारतातील एकमेव महाकाली मंदिर आहे जिथे देवीची मूर्ती झोपलेल्या अवस्तेत दिसते । येथील नवरात्र उत्सव 300 वर्षांपूर्वीपासून साजरा केला जातो। या मंदिराच्या यात्रेला महाराष्ट्रातील नांदेड भागातील विशेष भाविक येत असतात । नवरात्र मध्ये भाविक पायी यात्रा करीत असतात।पायदळ वारी या यात्रेतील विशेष आकर्षण असते तसेच येथे दिंडीच्या स्वरूपात हजारोंच्या संख्येत लोक जमत असतात। .

popular city and place