Bhadrawati-fort-of-gondvana-kingdom

भद्रावती मधील गोंडवाना राज्यातील किल्ला

Bhadrawati-fort-of-gondvana-kingdom

भद्रावतीच्या इतिहासात भर पाडणारी वास्तू म्हणजेच इथला किल्ला । या किल्याची स्थापना नागवंशी समुदायाची असल्याचे कडते । परंतु या समुदायानंतरचा काळ हा गोंडवाना राज्याचा होता । या किल्ल्यावर गोंडराज्याचा चिन्नांची ओडख होते । हा किल्ला सुमारे 1000 वर्ष पूर्वीचा असावा असा प्राथमिक अंदाज आहे।.

Bhadrawati-fort-of-gondvana-kingdom

भारतामध्ये सुमारे 1500 ते 1800 असे ३०० वर्ष राज्य केलेले सगड्यात प्राचीन गोंडवाना राज्य आहे। ह्या प्राचीन राज्याच्या नावावरून जगामध्ये ५० कोटी वर्षया पूर्वी दोन भुखंडा पैकी एकाला गोंडवानाल्यांड असे नाव देण्यात आले होते। गोंडवाना राज्यामध्ये चार स्वतंत्र राज्य होती , गढ़ मंडला, देवगढ़, चांदा, आणि खेरला । यातील चांदा म्हणजे आजचे चंद्रपूर आहे । भद्रावतीचा किल्ला याच राज्यात येत होता। हा इतिहास कदाचितच कोणाला माहित असावा ।.

Bhadrawati-fort-of-gondvana-kingdom

गोंडवाना राज्यातील चांदा या राज्याची राजधानी असलेला किल्ला सध्याच्या नामे चंद्रपूरला स्तिथ आहे । या किल्ल्याच्या आवारात गोंडराज्याची समाधी आहे । तसेच येथील अंचलेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे । ताडोबा सफारी साठी आलेले पर्यटक या किल्ल्याला नक्कीच भेट देत असतात । तसेच या भेटीनंतर भद्रावतीला पर्यटनाला आले असल्यास । भद्रावतीतील या गोंडवाना कालीन किल्ल्याला पर्यटक आवर्जून भेट देत असतात।.

Bhadrawati-fort-of-gondvana-kingdom

या किल्ल्याचे वर्णन केले असतात हा किल्ला शहराच्या मध्यभागी येतो । या वरून या जवाडपासच्या परिसराला किल्ला वॉर्ड असे नाव पडले आहे। हा किल्ला चौकोनी आकारात बांधलेला असून यास प्रचंड मजबूत व उंच असा परकोट, व चौकोन आकाराचे आठ बुरुज आहेत। प्रवेशव्दार पूर्व मुखी असून दोन बुरुजांच्या आत बांधलेले आहे। पश्चिमे कडील परकोटात एक दक्षिण मुखी लहान प्रवेशद्वार आहे। किल्ल्यात आतमध्ये पायऱ्यांची विहीर आहे या विहिरीस तीन ठिकाणाहून पायऱ्या आहे । तळाशी एक मोठ्या आकाराचा दगड दिसतो तेथून विजासन टेकडीपर्यंत भुयारी मार्ग होता असे येथील लोक सांगतात। इथे काही मुर्त्यांचा संग्रह बघायला मिडतो। त्यामध्ये गणेश, मस्यभेद करणारा अर्जुन, शिवपार्वती, महिषासुरमर्दिनी, भगवान महावीर, बुध्द, भद्रनाग, विष्णू लक्ष्मी, विष्णू चे विविध अवतार जसे नरसिंह, वराह, आणि नर्तकी, व्याल, सिह आणि काही विरगळ अश्या अनेक प्राचीन मूर्तीचा समावेश आहे।.

Bhadrawati-fort-of-gondvana-kingdom

हा किल्ला गोंडवाना साम्राज्यातील अतिशय महत्वाचा किल्ला आहे । या प्राचीन किल्ल्यावर भेट दिले असता त्याकाडातील मानव हा अतिशय कला संपन्न असावा असे भासते। तसेच या प्राचीन शहरातील बुद्ध लेणी चक 2000 वर्षय पूर्वीची आहे । या व्यतिरिक्त येते काही प्राचीन मंदिर आहेत । या मध्ये विदर्भातील एकमेव भद्रशेष नागाचे मंदिर आहे । तसेच विदर्भातील अष्टविनायक मध्ये वरदविनायक मंदिर भद्रावती मध्ये आहे । तसेच भारतामध्ये शिल्प कलेसाठी प्रसिद्ध असलेले जैन मंदिर याच शहरामध्ये आहे । या व्यतिरिक्त जमिनी खाली एका गुफे मध्ये असलेलें भवानी मातेचं मंदिर हे महत्वाची ठिकाणे आहे ।.

popular city and place