Best-places-to-visit-in-vidarbha

विदर्भात भेट देण्याचे ठिकाण

Best-places-to-visit-in-vidarbha

महाराष्ट्र हे राज्य 5 विभागांनी बनलेलं राज्य आहे । या विभागातील एक विदर्भ हा महाराष्ट्रातील पूर्वेस असलेला एक मुख्य विभाग। महाराष्ट्राची उपराजधानीचे शहर नागपूर हे विदर्भ मधेच आहे। विदर्भ हा पर्यटनाने नटलेला विभाग आहे। या विदर्भाचे सुद्धा दोन प्रशासकीय विभाग पडतात यामध्ये पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर विभाग तसेच पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती विभाग। या दोनही विभागामध्ये अनेक अशे प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळे आहेत। .

Best-places-to-visit-in-vidarbha

1.मेळघाट वाघ्र प्रकल्प : पश्चिम विदर्भाचा विचार केल्यास मेळघाट वाघ्र प्रकल्प हा मुख्य पर्यटनाचा भाग आहे। सातपुडा पर्वत रांगेत वसलेला हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये येतो। या प्रकल्पाला लागून असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे। इथे पर्यटकांची नेहमी गर्दी बघायला मिडते । या सोबतचच पर्वताच्या उत्तरेस मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे। या क्षेत्रामध्ये कोरकू समजतील लोक वस्ती प्रामुख्याने आढळतात।.

Best-places-to-visit-in-vidarbha

2.दीक्षा भूमी नागपूर: दीक्षाभूमी हे नागपूर, महाराष्ट्र, भारत येथे स्थित बौद्ध धर्माचे पवित्र स्मारक आहे; जेथे भारतीय घटनेचे शिल्पकार बी. आर. आंबेडकर यांनी 14 October 1956 रोजी अशोक विजया दशमी वर अंदाजे 600,000 अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला..

Best-places-to-visit-in-vidarbha

3.गज्यानं महाराज देवस्थान शेगाव :पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी असलेलं शेगाव हे देवस्थान। या देवस्थानांमध्ये रोज लाखो भाविक दर्शना साठी येत असतात। या शेगाव मध्ये आनंदसागर नावाचा एक प्रकल्प आहे। इथे अनेक पर्यटक तसेच मंदिरामध्ये भाविक येत असतात। .

Best-places-to-visit-in-vidarbha

4. ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प : पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याची ओडख असलेला ताडोबा-अंधारी वाघ्र प्रकल्प । या प्रकल्पाची ओडख म्हणजे येथील पट्टेदार वाघांची संख्या। महाराष्ट्रातील सगाड्यात जास्त वाघांची संख्या असणारा हा एक वाघ्र प्रकल्प आहे। या प्रकल्पाला बघण्याकरिता विदेशी पर्यटक सुद्धा येत असतात।.

Best-places-to-visit-in-vidarbha

4.कोका अभयारण्य भंडारा : 2013 साली अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेले अभयारण्य आहे। हे अभयारण्य भंडारा जिल्ह्यापासून अगदी जवड २० किलोमीटर अंतरावर आहे। या अभयारण्यात चितळ,हरीण मुख्य प्रमाणात दिसतात।.

Best-places-to-visit-in-vidarbha

5.लोणार सरोवर: भारतातील एकमेव सरोवर ज्याची निर्मिती लाखोवर्षया पूर्वी एका उलखापाताने झाली आहे। हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे। या सरोवराचे पाणी शार असल्यामुळे खाऱ्यापाण्याचे सरोवर म्हणून ओडखल्या जाते। तसेच या क्षेत्राला एका अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे। या सरोवर क्षेत्रात अनेक अशे प्राचीन मंदिरांचा समावेश आहे। या सरोवरावर अमेरिका तसेच भारताने अनेक संशोधन केले आहे। .

Best-places-to-visit-in-vidarbha

6.मार्कंडेश्वर स्वामी मंदिर: गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेश्वर स्वामींचे मंदिर हे इतिहास्कारानुसार सुमारे 2000 वर्ष पूर्वीचे मंदिर मानल्या जाते। हे मंदिर वैनगंगेच्या काठावरतीय वसलेले आहे। इथे २४ मंदिरांचा समूह होता असे इतिहासामध्ये नोंद आहे। सध्याच्या स्थितीत इथे १८ मंदिरांचा समूह बघायला मिडत। येथे दक्षिण वाहिनी वैनगंगा नदी उत्तरे कडे वाहते। .

Best-places-to-visit-in-vidarbha

7.आनंदवन वरोरा : जगप्रसिद्ध असलेले स्व, बाबा आमटे यांचं आनंदवन आश्रम चंद्रपूर जिल्हातील वरोरा तहसील मध्ये आहे। नागपूर वरून हे ठिकाण 110 किलोमीटर अंतरावर आहे। या आश्रमामध्ये कृष्टरोगी लोकांचे अनेक कलागुणांचा अनुभव मिळत असत।.

Best-places-to-visit-in-vidarbha

8.रामटेक-खिंडसी: प्रभू श्री रामाचे 600 वर्ष पूर्वीचे एका डोंगरावर मंदिर आहे। नागपूर वरून 50 किलोमीटर अंतरावर हे एक प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे। या क्षेत्रात डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर असा तलाव आहे यालाच खिंडसी असे नाव आहे। .

Best-places-to-visit-in-vidarbha

9.भद्रावती : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे अतिशय प्राचीन शहर आहे। या शहराचा इतिहास अगदी 2000 वर्ष पूर्वी घेऊन जातो। या शहरात सुमारे 2000 वर्ष पूर्वीची बुद्ध लेणी , सुमारे 1000 वर्ष पूर्वीच गणेश मंदीर तसेच विदर्भातील एकमेव भद्रशेषाचे नागमंदिर या सोबतच पार्श्वनाथ स्वामींचे मंदिर असे अनेक मंदिरांची नगरी म्हणून ओडख असलेलं विदर्भातील प्रेक्षणीय स्थळ आहे।.

Best-places-to-visit-in-vidarbha

10.हेमलकसा: गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक छोटस गाव। या गावाची मुख्य ओडख हि Dr प्रकाश आमटे यांचे लोकबिरादरी प्रकल्प। बाबा आमटेंची प्रेरणा घेत त्याच्या मुलाने DR प्रकाश आमटेंनी 1973 साली या प्रकल्पाची सुरवात केली। या प्रकल्पाची ओडख म्हणजे येथील आदिवासी लोकांची सेवा तसेच येथील जंगली प्राण्यांचा सहवास आहे। असे हे 10 प्रसिद्ध पर्यटन केंद्र विदर्भात आहे । या सोबतच अनेक पर्यटन केंद्र विदर्भात आहे। या सोबतच तुम्हाला काही माहिती असल्यास कडवा।.

popular city and place