चंद्रपूर हे सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. हे शहर विशेषतः महाराष्ट्रातील गरम शहर म्हणून याची ओडख आहे.उत्तरेकडून शहरात प्रवेश करण्याकरिता प्रवेशद्वारातून जावे लागते याला जटपुरा गेट म्हणून ओडकले जाते. या गेटवर सुरेख आर्ट सीन आहे.
भौगोलिकदृष्ट्या,महाराष्ट्रातील पूर्वेकडील चंद्रपूर हे एक महत्वाचे शहर मानले जाते । ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान ह्याच शहरालगद स्तिथ आहे । या शहराच्या प्रत्येक बाजूला एक दरवाजा आहे। पूर्वेकडील गेटला अचलेश्वर गेट असे नाव पडले आहे, तर पश्चिम दरवाजा बिन्बा गेट म्हणून अडखळे जाते । पठाणपुरा हे गेट दक्षिणेस आहे । आणि उत्तरेस जयपूर गेट आहे ।
शहरालगत दोन नद्या आहेत. जर उत्तरेकडून शहरात प्रवेश केले असता नदीचे दर्शन होते या नदीला इराई नदी म्हणून ओळखले जाते . तसेच पूर्वेकडील नदीला झरपट नदी म्हणून ओळखतात . या नदीच्या कडेला महाकाली मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. चंद्रपूर येथे हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
महाकाली मंदिर चंद्रपूर हे चांद्रपूर करांचे आराध्य दायवाद आहे । हे भारतातील एकमेव महाकाली मंदिर आहे जिथे देवीची मूर्ती झोपेच्या अवस्थेत दिसते। येथील नवरात्र उत्सव हा 300 वर्षांपूर्वीपासून साजरा केला जातो। हे मंदिर झरपट नदीच्या एका बाजूला आहे, तसेच दुसर्या बाजूला संतोषी मातेचे मंदिर आहे ।
संतोषी माता मंदिराजवळ एक प्रचंड मोठा किल्ला आहे ज्याला चंदा फोर्ट म्हणून ओळखले जाते। चंद्रपूर मधील हे पर्यटन स्थळांपैकी एक आहे। हा परिसर अंचलेश्वर गेट जवड आहे तसेच इथे अंकलेश्वर मंदिराचे पण दर्शन होते । या किल्ल्यावर त्या काळात गोंड राजांची राजधानी असावी असा उल्लेख आहे। हे भारताचे ऐतिहासिक स्थान आहे।
महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख पर्यटन राज्य आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील एक प्रमुख भाग आहे. ताडोबा हा मुख्य पर्यटनस्थळ आहे. चंद्रपूर ताडोबा राष्ट्रीय उद्यानास भेट देण्यासाठी इतर देशातून पर्यटक येतात. ताडोबा येथेही पर्यटकांची गर्दी असते.
चंद्रपूर हे नागपूरपासून 150 कि.मी. अंतरावर वसलेले शहर आहे. नागपूर विमानतळ हे परदेशी तसेच देशातील पर्यटकांसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. नागपूर ते चंद्रपूर बस सेवा पण उपलब्ध आहेत. याशिवाय खासगी वाहनेही येथे चालत असतात .
नागपूरहून चंद्रपूर रोज 10 हून अधिक गाड्या येत असतात । काही उदा केरला एक्स्प्रेस, तेलंगणा एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्स्प्रेस इत्यादि। ट्रेन मधून प्रवास केले असता 3 तासात नागपूर वरून चंद्रपुर हा टप्पा गाठता येतो (टीप:कोणत्याही प्रवासाच्या नियोजना दरम्यान आपण ट्रेनच्या सरकारी साइटची एकदा भेट दिली पाहिजे।)
जर तुम्ही पुण्याहून चंद्रपूरकडे ट्रेनने प्रवास करीत असाल तर प्रत्येक शुक्रवारी एकच ट्रेन आहे. जे पुणे काझीपेट एक्सप्रेस आहे. जर तुम्हाला खरोखर यायचे असेल तर काळजी करू नका, बहुतेक खासगी बस दररोज येतात. (टीप:कोणत्याही प्रवासाच्या नियोजना दरम्यान आपण ट्रेनच्या सरकारी साइटची एकदा भेट दिली पाहिजे।)
मुंबईहून चंद्रपूरला जाण्यासाठी सेवाग्राम एक्स्प्रेस ही रोजची ट्रेन आहे. याशिवाय सोमवारी आनंदवन एक्स्प्रेस तसेच शुक्रवारी ताडोबा एक्स्प्रेस आहे. (टीप:कोणत्याही प्रवासाच्या नियोजना दरम्यान आपण ट्रेनच्या सरकारी साइटची एकदा भेट दिली पाहिजे।)
चंद्रपूर जिल्हा सुपर थर्मल पॉवर स्टेशन व कोळसा खाणींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात चुनखडी आढळली, ती सिमेंटची कच्चा माल म्हणून पाहिली जाते. महाराष्ट्रात निर्माण होणार्या एकूण वीजपैकी 25% पेक्षा जास्त वीज या औष्णिक उर्जामधून तयार केली जाते. 3340 मेगावॅट क्षमतेचे हे औष्णिक केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र आहे.
Devotional place of chandrapur
wildlife sanctuary in india
best place to visit in chandrapur
Natural beauty with devotion
विदर्भात भेट देण्याचे ठिकाण
चंद्रपूर जिल्ह्या मधील नयसर्गिक पर्यट्ना करीत ताडोबा आणि आणि धार्मिक विचार केल्यास महाकाली मंदिर हे मुख्य स्थळ आहे . परंतु या व्यतिरिक्त या जिल्ह्या मध्ये जवाडपास 35 हुन अधिक ठिकाणे आहेत जिथे आपणास पर्यटनाला जात येत असते. प्रत्येक तहसील या जिल्ह्यतील पर्यटनाला महत्वाची भूमिका बजावत असतो. चंद्रपूर मध्ये अंचलेश्वर मंदिर, वीरशाह समाधी,महाकाली मंदिर, रामाला तलाव, आणि DR. A.P.J. अब्दुल कलाम पार्क आहे याव्यतिरिक्त अजयपूर येथे झोपला मारोती, हिरो स्टोन्स(गोंडराज्यच्या काळातील सैनिकांची समाधी असलेले शिल्प ) हे चिचप्पली या गाव जवड आहे. तसेच ताडोबा साठी जात असताना मोहुर्ली गेट आधी Buterfly गार्डन आहे हि सर्व ठिकाणे 12 हि महिने पर्यटना साठी उपलबध असतात . नागपूर हुन चंद्रपूर ला येत असताना चंदपूर आधी वरोरा हि तहसील आहे इथे बाबा आमटे यांचं जग प्रसिद्ध असलेलं आनंदवन आश्रम आहे. या नंतर 20 किलोमीटर अंतरावर भद्रावती तहसील आहे . भद्रावती तहसील एतेहासिक पर्यटन क्षेत्र मणून प्रसिद्ध आहे, इथे पुरातन कालीन भद्रनाग मंदिर,भवानी मंदिर,गणपती मंदिर आहे. या मंदिरावरील शिल्प कलेवरून 600 वर्षा आधीचे मंदिर आहे असे लक्षात येते . तसेच इथे विध्यासानं नावाची विध्यापीठ 500 वर्षा पूर्वी असल्याचे कढते याच परिसरामध्ये बौद्धकालीन विजासन लेणी आहे. तसेच पार्श्वनाथाचे जैन मंदीर हि भद्रावती शहराचे मुख्य आकर्षण मानून बघितले जाते . तसेच शिल्प कलेचे जिवंत उधाहरण, ग्राम उद्योग संग आहे. इथे चिनी माती पासून तयार केले शिल्प आहे . या व्यतिरिक्त भद्रावती या शहरा मध्ये किल्ला आहे हा किल्ला गोंड राज्याचा असावा असे येथील स्थानिक सांगतात. चंद्रपूर वरून 17 किलोमीटर अंतरावर बल्लारशाह शहर आहे . या शहरामध्ये गोंड राजा खांडक्या आणि नीलकंठ शाह यांची समाधी आहे , तसेच येथे गोंड राज्याचा किल्ला सुद्धा आहे . बल्लारशाह रेल्वे स्टेशन हा महाराष्ट्रातील मध्यरेल्वेचे शेवटचे ज्यनगशन आहे . या रेल्वे स्टेशनला ताडोबातील प्रांण्यांचे सुंदर असे चित्रीकरण करण्यात आले आहे . जिवती हा तहसील चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्ग प्रेमी साठी एक उत्तम असं पर्यटन केंद्र आहे येथील माणिकगड फोर्ट हा पहाडावरील जंगलातील एक किल्ला आहे. या किल्याच्या चवफेर पहाड आहे. तसेच येथून कोरपना शहर याच्या दरम्यान धानोली गावातील पकडीगुदम तलाव हा सुद्धा निसर्गातील एक सुंदर तलाव आहे. चंद्रपूर जिल्हात पावसाळा ऋतू हा वेगडया आकर्षणाचा विषय बनत असतो. या जिल्ह्यात काही तलाव तर काही धरणे आहेत . सिंदेवाही तहसील मधील आसोला मेंढा तलाव तसेच गडमोशी धरण बघण्या करीत येते पर्यटक येत असतात. तसेच चिमूर तहसील या ऋतूत पर्यटनाचे मुख्य केंद्र बनत असते येथील रामदेगी वॉटरफॉल ,मुक्ताई वॉटरफॉल आणि घोडाझरी तलाव बघण्याकरिता पर्यटकांची खूब गर्दी होत असते . चंद्रपूर जिल्हातील सोमनाथ मंदिर मूल आणि सोमेश्वर मंदिर राजुरा हि सुद्धा पर्यटकांचे महत्वाचे ठिकाणे आहेत . अशी हि 35 ठिकाणे जिथे पर्यटक पर्यटना करीत येत असतात.
1. मारोतराव शाम्बशिओ कन्नमवार हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे आणि विदर्भाtil पहिले मुख्यमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या विधानसभेचे होते. २. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर हे भारतातील काही मुख्य 10 पॉवर प्लांट पैकी एक आहे तर महाराष्ट्रातील 25% ऊर्जा हा एकटा प्लांट देत असतो. 3. भारत हा वाघांसाठी नंदनवन आहे, येते पूर्ण जगाच्या जवाडपास 70 % वाघ इथे आहेत. तसेच ताडोबा अंधारी वाघ्र्य प्रकल्प हे महाराष्ट्रातील वाघांचे नंदनवन आहे येथे महाराष्ट्रातील जवाडपास 45 % वाघ राहतात. 4 चंद्रपूर मधील महाकाली मंदिरातील मूर्ती हि एकमेव भारतातील महाकालीची मूर्ती आहे जी झोपलेल्या अवस्तेत आहे. 5. चंद्रपूर हा जिल्हा गडचिरोली जिल्हा वेगडा होण्या आधी महाराष्ट्रातील क्षेत्रफडाच्या दृष्टीने सगड्यात मोठा जिल्हा होता.