ballarshah

 • ballarshah

  Historical ballarshah city | ऐतिहासिक बल्लारशाह शहर

  Date:2020-05-14 16:37:52

  चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह हे शहर प्राचीन गोंडवाना राज्यातील मुख्य असलेलं शहर । या शहराचा इतिहास 14 व्य शतकात नेतो । गोंड राजा खांडक्या बल्ला शाह यांनी शिरपूर (आज तेलेंगाना राज्यात आहे) तेथील राजधानी हि बल्लारशाह ला आणली होती। या नंतर याच राज्याने हि राजधानी चंद्रपूर इथे नेली ।

 • ballarshah

  Ballarshah city | बल्लारशाह शहर

  Date:2020-05-14 16:39:39

  बल्लारशाह हे शहर चंद्रपूर पासून अगदी जवड सुमारे 16 किलोमीटर अंतरावर वसलेलं शहर आहे। या शहराला बल्लारपूर या नावाने सुद्धा ओळखले जाते । या शहरातील रेल्वे जंगशन हे मध्यरेल्वेचे महाराष्ट्रातील शेवटचे मुख्य रेल्वे जंगशन आहे । यानंतर इथून तेलंगणा राज्याची सुरवात होते । या शहरामधील बस स्टॉप हे अतिशय आधुनिक पद्धतीचे आहे । बल्लारशाह मुख्यतः इथल्या पेपर मिल मुळे प्रसिद्ध आहे । तसेच येथील किल्ला हा गोंडवाना काळातील मुख्य किल्ला आहे ।

 • ballarshah

  gondwana history | गोंडवाना कालीन इतिहास

  Date:2020-05-15 21:29:58

  गोंडवाना हा अतिशय प्राचीन कालखंड मानला जातो यावरूनच जगात सर्वात आधी आस्तित्वात आलेल्या दोन भुखंडा पैकी एकाला गोंडवाना असे नाव देण्यात आले होते। त्यानंतर याच भूखंडातील काही भाग हा भारत ,काही भाग आफ्रिका तसेच आस्ट्रलिया यामध्ये विभाजन झाला असे सांगितल्या जाते ।

 • ballarshah

  ballarshah paper mil | बल्लारशाह पेपर मिल

  Date:2020-05-16 11:50:24

  बल्लारशा येथील पेपर मिल महारष्ट्रातील सर्वात मोठी पेपर मिल आहे। येथील कागद हा अतिशय उत्तम प्रतीचा मानला जातो । तसेच इथे अनेक दगडी कोळसा खाणी आहेत। दगडी कोळशाचा वापर करून इथे विदुत निर्मिती केली जाते । तसेच यासोबत लाकूड कटाई कारखाने ,कागद गिरणी हे या शहराचे मुख्य वैशिष्ट्य आहे।

 • ballarshah

  Ballarpur name convert in ballarshah | बल्लारपूर ते बल्लारशाह नामकरण

  Date:2020-05-16 12:05:46

  बल्लारशाह हे शहर वर्धा नदीच्या काठावर वसले आहे । पश्चिम दिशेला वर्धा नदीच्या चंद्राकार किनाऱ्यावर राजा खांडक्या बल्लारशाह यांनी सण 1472 साली राजधानीचा किल्याची निर्मिती केली होती । पुढे याच किल्ल्यावर नीलकंठ शाह राजाला नजर कैदेत ठेवलं होत । तिथेच या राज्याचा मृत्यू देखील झाला । राजा बल्लारशा याच्या नावावर किल्ला आणि समोर शहराचे नाव ठेवण्यात आले । तसेच येथील रेल्वे स्टेशन चे नाव बल्लारशाह आहे ।

 • ballarshah

  industries in ballarshah | बल्लारशाह उद्योग

  Date:2020-05-16 12:09:30

  औद्योगिक दृष्ट्या बल्लारशाह मध्ये अनेक मोठी कारखाने आहे । येथील रोजगारांच्या संधी खूब मोठ्या प्रमाणात दिसतात । इथे BILT नावाने कारखाना आहे । या कारखान्यात ग्राफिक पेपर चे प्रॉडक्शन होते । या सोबतच येथे दगडी कोळशाच्या सार्वजनिक खाणी आहे । या खाणींमध्ये पेपर मिल मध्ये अनेक रहिवासी काम करतात ।

 • ballarshah

  Area of ballarshah | बल्लारशाहचे क्षेत्रफळ

  Date:2020-05-16 12:13:19

  क्षेत्रफळाच्या दृष्टीने बल्लारशा 209 चौ कि मी इतका आहे । तसेच हे शहर समुद्र सपाटी पासून 354 मी उंचीवर आहे । या शहरावरून राजुरा तसेच गोंडपिपरी या शहरामध्ये जाता येते । इथून काही अंतरावर तेलेंगाना या राज्याची सीमा आहे । चंद्रपूर वरून या शहरात येत असताना काही जंगलाचा परिसर पडत असतो। या कारणाने इथे जंगली प्राण्यांचा वावर होताना दिसतो।

 • ballarshah

  famous food | प्रसिद्ध खाद्य

  Date:2020-05-16 12:37:48

  या शहराची सीमा तेलंगणा राज्याच्या जवड असल्याने इथे खाद्य पदार्थामध्ये डोसा ,इडली सांबर, सांबर वडा , उपमा तसेच अनेक साऊथ इंडियन पदार्थ प्रामुख्यने दिसतात । या सोबतच या शहरामध्ये कारखाने असल्याने परप्रांतीय लोक सुद्धा दिसतात । शहरामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात यामध्ये गणेशउत्सव हा महत्वाचा उत्सव आहे ।

 • ballarshah

  languages | भाषा

  Date:2020-05-16 12:41:27

  प्रामुख्याने या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते परंतु या सोबत इथे गोंडी, हिंदी, तेलगू तसेच वराडी भाषा सुद्धा बोलतात।

 • ballarshah

  बल्लारशाह शहरापासून तेलंगणा राज्यातील जवड असलेले शहर

  Date:2020-05-16 12:42:41

  दक्षिण आणि मध्य भारतातील प्रवेशद्वार जिल्हा म्हणून ओळखले जाणारे, आदिलाबाद हे तेलंगणा, भारत राज्यातील उत्तर भागात वसलेले एक छोटे शहर आहे। धबधबे आणि संस्कृती असणारी आदिलाबाद हे स्वतःच एक नंदनवन आहे। शहराला एक महत्त्वाचा इतिहास देण्यात आला आहे आणि आता त्यात अनेक चालीरीती आणि श्रद्धा यांचे अविश्वसनीय मिश्रण दिसून येते । हे शहर बल्लारशाह पासून अगदी जवाड 100 किमी अंतरावर वसले आहे ।

 • ballarshah

  Ballarshah station | बल्लारशा स्टेशन

  Date:2020-05-16 12:44:00

  रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानके ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि स्थानिक आदिवासी कलेवर आधारित विविध पेंटिंग्ज, शिल्पकला आणि म्युरल्ससह सुशोभित केली आहेत। या सौंदर्यीकरणामध्ये ही दोन्ही स्थानके पूर्णपणे बदलली आहेत। इथे आल्यावर एक नवीन अनुभव होतो । या स्टेशन वर जवाडपास सर्व गाड्या थांबत असतात । या शिवाय इथून अनेक गाड्यांचे लोको पायलट पण बदली होत असतात । हा मुख्य स्टॉप असल्याचे कडते ।

 • ballarshah

  Citys in chandrapur dist | चंद्रपूर जिल्ह्यातील शहरे

  Date:2020-05-16 15:35:43

  महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह सोबतच आणखी काही तालुके आहेत यामध्ये मुख्य चंद्रपूर सोबतच भद्रावती इथे एतेहासिक किल्ला आहे तसेच ताडोबा या जिल्ह्याची मुख्य ओडख आहे । या सोबतच या जिल्ह्यात 30 अशी मुख्य ठिकाणे आहे जिथे पर्यटनाला जात येथे ।

 • Be Part
  Of Our
  story

More information

popular city and place

Other city from chandrapur